मराठी बिग बॉस हा शो सध्या खूप गाजला एका घरात अनेक स्पर्धक आणि त्यामध्ये जिंकण्यासाठी लागलेली चढाओढ बघण्यालायक होती. इंग्रजी मधील बिग ब्रदर या कार्यक्रमावर हा शो आधारित आहे. यावर्षी मराठी बिगबॉस मध्ये अनेक नावाजलेले चेहरे होते. परंतु या सर्व गोष्टीत एक विदर्भाचा चेहरा नाव मिळवून गेला तो म्हणजे शिव ठाकरे
तब्बल १७ लाख रुपये एवढे बक्षीस शिव ठाकरे ला मिळालेले आहे. शिव ठाकरे सर्वप्रथम टीव्हीवर झळकला तो म्हणजे एमटीव्हीच्या रोडीज मधून, अमरावतीसारख्या जिल्ह्यातून आलेल्या शिवनं ‘एमटीव्ही रोडीज’मध्येही स्थान पक्क केल्यानं त्याचं प्रचंड कौतुक झालं. त्याला चांगली प्रसिद्धीही मिळाली. ‘एमटीव्ही रोडीज’चा स्पर्धक असताना तो रणविजय सिंगच्या ग्रुपमध्ये होता.
शिव ठाकरे याचे बालपण जरी अमरावती जिल्ह्यात गेले असले, तरी सध्या तो पुण्यामध्ये राहत आहे. पुण्यात तो डान्सचे क्लास घेत होता. शिव ठाकरे शहरातील नंदनवन कॉलनीत राहताे. वडील मनोहरराव ठाकरे किराणा दुकान व पानटपरी चालवतात, तर आई गृहिणी आहे.
घरची परिस्थिती बेताची असल्यानं भल्या पहाटे आपण दूध आणि पेपर टाकायचं काम देखील करायचो, असं त्यानं ‘बिग बॉस’च्या घरात सांगितलं होतं. अभिनेत्री वीणा जगतापसोबत असलेल्या त्याच्या खास मैत्रीमुळे तो या संपूर्ण पर्वात चर्चेत होता.
प्रेक्षकांना त्याच्या खेळासोबतच त्याची आणि वीणाची केमिस्ट्री देखील आवडली. ‘बिग बॉस’नंतर आपण लग्न करणार असल्याचंही शिव आणि वीणा यांनी आधीच्या एका एपिसोडमध्ये जाहीर केलं होतं.
शिव सांगतो, पाचव्या वर्गापासूनच मला नृत्याची प्रचंड आवड होती. मात्र, खरे व्यासपीठ दहावीनंतरच मिळाले. मला याच क्षेत्रात करिअर करायचे होते. कुटुंबीय म्हणायचे, यापेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे. त्यामुळे छंद जोपासून शिक्षण सुरू ठेवले. पॉलिटेक्निक, अभियांत्रिकीला असताना स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून कला सादरीकरणाची संधी मिळाली.
तसेच सुरुवातीच्या काळात गणपती मूर्ती, दूध, फटाकेही विकले. यातून आलेल्या रकमेतून स्वत:चा खर्च भागवला. मराठी बिग बॉसचे होस्ट आणि अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजेकर यांनी शिवला त्यांच्या ‘वीर दौडले सात’ या आगामी चित्रपटात काम करण्याची संधी दिली आहे. बिग बॉस मराठी-2 च्या महाअंतिम सोहळ्यात त्यांनी ही घोषणा केली.
शिव ठाकरे यांच्या भावी आयुष्यासाठी खासरे तर्फे शुभेच्छा ! आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.