सध्या निफ्टि सेंन्सेक्स तळ गाठत असताना , एकुनच मार्केट मध्ये मंदीचे वातावरण आहे , पन गेल्या ७५ दिवसांत सोन्याचा दर सतत वाढत आहे सोनाच्या दरात जवळपास १५% वाढ नोंदवली आहे, सोनाच्या दर लवकरच उच्चांक गाठेल असं मार्केट मधले तज्ञ म्हनतात , जेम्स अँन्ड ज्वेलरी फाउंडेशनचे माजी अध्यक्ष नितीन खंडेलवाल म्हनतात पहिल्यांदाच एमसीएक्सपेक्षा खाली सोने आहे , पुढे दसरा व दिवाळी सारखे सन विवाहाचा हंगाम असल्यामुळे सोन्याच्या दरात सध्या तरी घसरणीची शक्यता नाही.
मार्केट तज्ञानुसार विदेशी गुंतवणूकदार , एफआयआयच्या यांच्या व्दारे निधी काढून घेणे , मंदी येन्याची शक्यता , आॅटो , रियल इस्टेट मध्ये वाढ होत नसल्याने घसरण सुरू आहे
शेयर मार्केट मध्ये घसरणीचे कारण
सुपर रिच हा नविन कर वाढवल्यामुळे , एफपीआयच्या नियमांमुळे शेयर बाजारावर परिणाम झाला आहे तसेच लाॅंग टर्म गेन टॅक्स त्यामुळे मार्केट अनिश्चितेकडे सरकतय, आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत निफ्टित नोंद असलेल्या कंपन्यांच्या फायद्याचा अंदाज १२% होता.
मान्सुन मुळे मार्केट वरती विपरीत परिणाम झाला. आॅटो सेक्टर मध्ये मंदी, रीयल इस्टेट क्षेत्रात अपेक्षित वाढ न होने मागणी घटणे.
सोन्याच्या भावात वाढ होण्याची कारणे
अर्थसंकल्पात २.५% आयात ड्युटी वाढवल्यामुळे देशातील बाजारात सोन्याचे दर वाढले. आंतरराष्ट्रीय गुंतवणूक संस्था व वर्ल्ड बँक अहवालात जागतिक अर्थव्यवस्थेत स्थिरता आल्याचे म्हटले आहे , यामुळे सोन्याच्या खरेदीत वाढ झाली
भारतातील आरबीआय सोबतच इतर देशांतील केंद्रीय बॅंकांनी आपला सोन्याचा साठा वाढवला आहे. अमेरीकेने जवळपास एका दशका नंतर व्याज दरात कपात केली आहे त्यामुळे सोने वाढले आहे
अमेरीका व चिन मधील व्यापार युध्दामुळे जगाच्या मार्केट मध्ये मंदिचे वातावरण आहे त्यामुळे डाॅलरच्या तुलनेत इतर देशांचे चलन कमकुवत आहे. डाॅलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे सोन्याचे दर वाढले आहे भारतात जवळपास ८०% सोने आयात केले जाते
एकुनच अस्थिर वातावरणात व मार्केट मध्ये मंदी यामुळे लोकांचा सोने खरेदीकडे कल वाढलाय
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.