हाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा भूकंप काल झाला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले आहे. दस्तुरखुद्द शरद पवार आणि पाठिंबा द्यायला गेलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनाही याबद्दल माहिती नव्हते.
अजित पवारांचा निर्णय वैयक्तिक आहे, राष्ट्रवादी पक्षाचा भाजपला पाठिंबा नाही असे शरद पवारांनी सांगितले. यानिमित्ताने शरद पवारांच्या बाबतीत “आपल्या आईच्या विरोधात शरद पवार स्वतः आदल्या रात्री उभे राहून दुसऱ्या दिवशी निवडून आले होते” अशा आशयाची एक पोस्ट व्हायरल केली जात आहे. त्यात किती तथ्य आहे ?
कोण होत्या शरद पवारांच्या आई ?
शारदाबाई पवार या शरद पवारांच्या मातोश्री होत्या. एका पुरोगामी कुटुंबात त्यांची जडणघडण झाली. गोविंदराव पवार यांच्या त्यांचा विवाह सत्यशोधक पद्धतीने झाला. आपले दागिने विकून शारदाबाईंनी काटेवाडी येथे जमीन घेतली.
त्या स्वतःच शेती करत. त्याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शिक्षणकार्यात त्यांनी मोलाची मदत केली. १९३८ मध्ये त्या काँग्रेस पक्षातर्फे पुणे लोकल बोर्डाच्या सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आल्या.शेकापच्या स्थापनेनंतर त्यांनी त्यात प्रवेश केला.
शरद पवार आपल्या आईच्या विरोधात उभे राहून निवडून आले होते काय ?
ही घटना १९५९ मधली आहे. बारामतीचे खासदार केशवराव जेधे यांच्या निधनानंतर लागलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने त्यांचे चिरंजीव गुलाबराव जेधेंना उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात शेकापने शरद पवारांचे ज्येष्ठ बंधू वसंतराव पवारांना उमेदवारी दिली होती. ९ फेब्रुवारी १९६० रोजी मतदान होणार होते.
यशवंतराव चव्हाण स्वतः शारदाबाईंकडे आले आणि शरद पवार यांना आमच्याकडे द्या अशी विनंती केली. शारदाबाईंनी आपल्या मुलांवर कुठलेही बंधन लादले नाही. शरद पवारांनी शारदाबाईंची परवानगी घेऊनच काँग्रेसचा युवक कार्यकर्ता म्हणून काँग्रेसचा प्रचार केला आणि गुलाबराव जेधे निवडून आले. शारदाबाई पवारांच्या चरित्र लेखिका सरोजिनी चव्हाण यांनी ही माहिती दिली.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.