देश अन् राज्याच्या राजकारणातील एक महत्वाचं व्यक्तिमत्त्व म्हणून गत पन्नास वर्षापासून आपलं ‘पॉवर’ फूल स्थान निर्माण करणार राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ऐंशीवा वाढदिवस नुकताच संबंध राज्यात साजरा झाला. राजकारणातील या ‘साहेबा’ वर प्रेम करणार्यांची संख्याही तितकीच अणगणीत आहे.
मंगेश अनिरूध्द निपाणीकर हा ऊस्मानाबाद जिल्ह्यातील निपाणी(ता. कळंब) येथील एक असाच एक ‘ पवारप्रेमी ‘ आहे. तो राज्याच्या कलाविश्वातील एक नावाजलेला अष्टपैलू आर्टिस्ट ही आहे.या पट्याने यंदाचा पवार साहेबांना आपल्या कलेतून शुभेच्छा देण्याचा संकल्प केला.यासाठी निवडला तो अतिशय कठीण असा ‘ग्रास पेटींग’ कलाप्रकार.
यासाठी निलंगा जि. लातूर येथे गतवर्षी साडेसहा एकर क्षेत्रात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ग्रास पेटींगचा अनुभव पाठीशी होता.यामुळेच १२/१२ चा मुहूर्त साधत, पवार साहेबांचा वाढदिन धान्याच्या उगवणीपासून पवार साहेबांची प्रतिमा साकारून शुभेच्छा देण्याचा संकल्प केला.
यानुसार दहा दिवसापूर्वी केलेल्या आखणीनुसार तब्बल १ लाख ८० हजार स्क्वेअर फूट आकारात मेथी, हरभरा, गहू, अळीव, व ज्वारी या पाच प्रकारच्या वाणांच्या ६०० किलो बियाणांचे बारकाईने बिजारोपण करण्यात आले.यावर योग्य ते सिंचन करण्यात आले.
अखेर १२ डिसेंबर रोजी शरद पवार यांच्या वाढदिनी अपेक्षा व नियोजनाप्रमाणे बिज अंकूरले.उगवलेल्या मोडातून साकार झाले ते माजी कृषि मंत्री शरद पवार.एका शेतकरी पूत्रांने देशाच्या शेती क्षेत्रात भरीव योगदान असलेल्या नेत्यास दिलेल्या या आगळ्यावेगळ्या शुभेच्छा कला क्षेत्रात एक नवा विक्रम नोंदवून गेल्या आहेत.
-बालाजी अडसूळ
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.