शरद पवार म्हणजे महाराष्ट्राची नस ओळखणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. कधी विरोधकांच्या टीका, तर कधी कृषी, सहकार, कला, क्रीडा, शिक्षण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण इत्यादि वेगवेगळ्या क्षेत्रांमधील त्यांच्या ठळक सहभागाच्या अनुषंगाने हे नाव आपल्या कानावर पडत आले आहे. स्वातंत्र्यानंतरच्या भारतातील प्रत्येक राजकीय राजकीय घडामोडीचे ते साक्षीदार आहेत. जनतेच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होणाऱ्या पवार कुटुंबावर कोसळलेल्या एका घटनेविषयी आपण आज जाणून घेणार आहोत, ती घटना म्हणजे शरद पवारांच्या मोठ्या भावाचा झालेला खून…
कोण आहेत ते शरद पवारांचे बंधू ?
शरद पवारांना एकूण सहा भाऊ आणि चार बहिणी होत्या. त्यापैकी त्यांचे सर्वात थोरले बंधू होते वसंतराव पवार ! वसंतराव हे एक निष्णात वकील होते. त्याकाळात बारामती आणि पुणे कोर्टामध्ये त्यांचे मोठे नाव होते. एकदा वसंतरावांकडे दोन भावांच्या जमिनीच्या वादाची एक केस आली. वसंतरावांनी कोर्टात योग्यरीत्या त्यांच्या अशिलाची बाजू मांडून त्याला केस जिंकवून दिली. परंतु त्या अशिलाला जमीन काण्यात रस नसल्याने त्याने आपली जमीन वसंतरावांनाच विकली. त्यामुळे विरोधी बाजूचा व्यक्तीचा वसंतरावांवर राग होता. त्याने वसंतरावांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती.
अशी झाली पवारांच्या भावाची ह त्या
शरद पवारांचे वडील गोविंदराव (आबा) यांना ही गोष्ट समजताच त्यांनी सर्वात धाकटा मुलगा प्रतापराव यांना वसंतरावांकडे पाठवले आणि पोलिसांनी त्या विरोधी बाजूच्या व्यक्तीला दिलेले बंदुकीचे लायसन्स रद्द करण्याची मागणी करण्यासाठी वसंतरावांना उद्युक्त केले. आबांनी पाठवलेल्या कागदपत्रांवर वसंतरावांनी नजर फिरवली आणि ते प्रतापरावांना म्हणाले, “याचा काय उपयोग होणार आहे ? त्याची इच्छा असेल तर तो मला मारुन टाकेल. मी ही परिस्थिती हाताळू शकतो.” परंतु आठवडाभरानेच वसंतराव त्या जमिनीकडे फेरफटका मारायला गेलेले असताना त्या व्यक्तीने रंगाच्या भरात वसंतरावांना गोळ्या घालून त्यांची हत्या केली. त्यावेळी वसंतरावांचे वय ३५ वर्ष होते.
वसंतरावांची ह त्या करणाऱ्या व्यक्तीचे पुढे काय झाले ?
ज्या व्यक्तीने वसंतरावांचा खून केला ती व्यक्ती सुपारी घेऊन अशी कामे करायची, असे बारामतीतील अनेक लोकांचे म्हणणे होते. त्यानंतर वसंतरावांच्या हत्येच्या प्रकरणात त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली. परंतु नंतर त्याने अपील केल्यानंतर ती शिक्षा आजन्म कारावासात परावर्तित करण्यात आली. नंतर १९६९ साली गांधी शताब्दी वर्षानिमित्त सरकारने अनेक कैद्यांना माफी देऊन त्यांना सोडून दिले, त्यात त्या व्यक्तीचाही समावेश होता. कालांतराने त्या व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला आणि वसंतरावांच्या खुनामागचे नेमके कारण आणि त्यामागे कोणाचा हात होता हे रहस्य त्याच्यासोबतच निघून गेले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.