खिशात ३०० रुपये घेऊन दिल्लीवरुन मुंबईमध्ये आपले भवितव्य आजमावण्यासाठी आलेला शाहरुख खान आज मुंबईच्या बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत “किंग” म्हणून ओळखला जातो. दिलीप कुमार, अमिताभ बच्चन यांच्यानंतर हिंदी चित्रपटसृष्टीचा सर्वाधिक काळ गाजवणारा कलाकार म्हणून शाहरुखला ओळखले जाते. दूरदर्शन सिरीयल फौजी, सर्कस आणि “दिवाना” या पहिल्या हिंदी चित्रपटातून शाहरुखने आपल्या अभिनयाला सुरुवात केली. अत्यंत गरिबीतून वर आलेला कलाकार म्हणून शाहरुखच्या यशाकडे पाहिले जाते.
बेघर शाहरुख आज राहतो कोट्यवधींच्या बंगल्यात
शाहरुख खान मुंबईत आला तेव्हा त्याच्याकडे राहायला स्वतःचे घर नव्हते. १९९२ पासून शाहरुखने हिंदी चित्रपटात आपल्या उत्कृष्ठ अभिनयाच्या जोरावर आपले स्थान निर्माण केले. त्याच बळावर शाहरुखने १९९५ मध्ये १५ कोटी रुपयांना शाहरुखने ६००० स्क्वेअर फुटांचा एक बंगला विकत घेतला आणि नंतर त्याला “मन्नत” नाव दिले.
शाहरुखची पत्नी गौरी खानने स्वतः या बंगल्याचं इंटेरीयर डिझाईन केले आहे. आजघडीला या बंगल्याची किंमत २०० कोटींच्या घरात आहे. बंगल्यामध्ये दोन लिव्हिंग रुम, मुलांसाठी प्लेरुम, एक ग्रंथालय, एक खाजगी बार, जिम आणि मनोरंजन केंद्र आहे.
हे आहेत मन्नत बंगल्याचे जुने मालक
शाहरुखने मन्नत बंगला मोकळ्या जागेत बांधला नाही किंवा त्याचे वडिलोपार्जित सुद्धा नव्हता. गुजराती वंशाच्या एका पारशी व्यक्तीकडून त्याने हा बंगला विकत घेतला आहे. किकू गांधी असे त्या पारशी व्यक्तीचे नाव असून त्यांच्या बंगल्याचे नाव “व्हिला व्हिएन्ना” असे होते. त्याशेजारीच असणाऱ्या केकी मंजिल नावाच्या इमारतीत किकू गांधी वास्तव्यास होते.
एके दिवशी किकू गांधींच्या घराजवळ फोन लाईनसाठी खड्डा पाडण्यात आल्यामुळे ते राहवले होते, त्या फोन लाईन शाहरुखच्या घराकडे नेली जात होती. झालेल्या प्रकाराबद्दल माफी मागण्यासाठी शाहरुख किकू गांधींच्या घरी गेला तेव्हा त्याच्या नजरेत व्हिला व्हिएन्ना भरला. शाहरुखने तो बंगला विकत घेतला. सुरुवातीला त्याने घराला जन्नत नाव दिले होते, पण नंतर ते बदलून मन्नत करण्यात आले.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.