सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने बॉलिवूडमध्ये एका नव्या वादाला जन्म दिला आहे. ११ चित्रपटांच्या माध्यमातून आपल्या अभिनयाबद्दल कौतुक प्राप्त करणाऱ्या सुशांत सिंह राजपूतने आपल्या करिअरच्या या टप्प्यावर मृत्यूची वाट का निवडली या प्रश्नाचे उत्तर लोक आपापल्या पद्धतीने शोधात आहेत. अशामध्ये सोशल मीडियावर हिंदी चित्रपट सृष्टीतील गटबाजी आणि वशिलेबाजीवरुन एक मोठा वाद सुरु झाला आहे.
सुशांतच्या जाण्यानंतर अनेक बॉलिवूड कलाकारांचे करिअर कसे बरबाद करण्यात आले याविषयीची माहिती समोर येत आहे. शाहरुख खान आणि सैफ अली खानमुळेच बॉलिवूडचा दर्जेदार अभिनेता नील नितीन मुकेशचे करिअर बरबाद झाल्याचे सांगण्यात येत आहे.
काय होता नील नितीन मुकेश आणि शाहरुख-सैफ यांच्यातील वाद ?
नील नितीन मुकेश हा प्रसिद्ध गायक मुकेश यांचा नातू आणि अभिनेता नितीन मुकेश यांचा मुलगा आहे. जॉनी गद्दार, न्यूयॉर्क, गोलमाल अगेन सारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने काम केले आहे. शाहरुख आणि सैफ अली खान अँकरिंग करणाऱ्या एका पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये नील नितीन मुकेश सहभागी झाला होता.
त्या शो मध्ये शाहरुखने नीलला उभे करुन त्याची टिंगल करत एक प्रश्न विचारला, “तुझे नाव नील नितीन मुकेश आहे, यामध्ये आडनाव कुठे आहे ?” हा प्रश्न ऐकून प्रेक्षक हसायला लागले. नील शांतच बसला. शाहरुखने पुन्हा त्याची खिल्ली उडवत त्याला सांगितले, “आमच्या सगळ्यांची आडनावे आहेत, शाहरुख खान, सैफ अली खान; तुझं आडनाव का नाही ?” प्रेक्षक पुन्हा हसतात.
नीलला हे आवडले नसल्याने तो उत्तर देताना म्हणाला, “माफ करा सर पण हा मला सरळसरळ अपमान वाटतो. ही योग्य पद्धत नाही. तुम्हाला माहित नसेल पण माझे वडील माझ्या सोबत बसलेले आहेत. तुम्ही लोक ज्याप्रकारचे प्रश्न विचारात आहात ते मूर्खपणाचे आहेत आणि तुम्ही नेहमी मला असे प्रश्न विचारुन माझी टिंगल करता.
मला हा माझा अपमान वाटतो आणि म्हणून मी तुम्हाला एकच सांगू शकतो, तुमचे थोबाड बंद करा !” इतके ऐकल्यानंतरही सैफ अली खानला पुन्हा नीलची टिंगल करण्याची खुमखुमी येते. त्यावर नील म्हणतो, “मला इथपर्यंतचा प्रवास करण्यासाठी कधी आडनावांची गरज पडली नाही. त्यामुळे मी तुम्हालाही सांगू इच्चीतो, तुमचे थोबाड बंद करा !”
दोन्ही खानांना थेट आडनावावरुन नील नितीन मुकेशने दिलेले उत्तर प्रचंड झोंबले. कशीबशी आपली लाज वाचवण्यासाठी त्यांनी नीलच्या उत्तरावर हसू आणत विषय बदलला. पण या प्रकरणानंतर नील नितीन मुकेशला बॉलिवूडमध्ये चित्रपट मिळणे बंद झाले आणि त्याचे बॉलिवूड करिअर बरबाद झाल्याचे सांगत यामागे शाहरुख आणि सैफचा हात असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे.
बघा तो व्हिडीओ-
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.