विवाहापूर्वी सेक्स करणे योग्य आहे का नाही? यावर भारतात वेगळा समज आहे. पाशात्य देशात ह्या संबंधी विचारधाराही वेगळी आहे. यासंबंधी प्रत्येकाचे वेगळे मत असू शकते. काहींच्या मते, हे विवाहापूर्वी सेक्स करणे योग्य आहे तर काहींना ते अतिशय चुकीचे आहे व त्याला पाप समजतात. परंतु प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात. याला सेक्सही अपवाद राहिलेला नाही. याचेही काही फायदे तर काही तोटे आहे. जाणून घेऊया…
विवाहापूर्वीच्या सेक्सचे फायदे
नाते घट्ट होते
आयुष्य आनंदी घालवण्यासाठी दोन मने जुळणे म्हणजे त्यांचे विचार विनिमय योग्य होणे आवश्यक असते. यासाठी प्रणय हा महत्त्वाची भूमिका बजावतो. एकमेकाला माणूस शारीरिकरित्या जवळ आल्यावर चांगला समजू लागतो. यामुळे मानसिक ताण कमी होतो. तसेच आपल्या जवळचे कोणतीरी असल्याच्या भावनेने सुरक्षित वाटते. स्त्रिया ज्या व्यक्ती सोबत संभोग करतात त्यांना तो प्राणप्रिय असतो म्हणजे त्याच्यावर खूप विश्वास असतो यामुले नाते घट्ट होते.
उत्सुकतेला पूर्णविराम
काही गोष्टी तुम्ही वेळेत करता त्यांचा आनंदही वेगळाचा असतो. सेक्सविषयी अनेकांच्या मनात विविध कल्पना असतात. मात्र जेव्हा तुम्ही सेक्स करता तेव्हा याला पूर्वविराम मिळतो. आणि अतिउस्ताहात कधी कधी या आनंदा पासून आपण मुकतो म्हणून लग्ना अगोदर हा अनुभव असावा.
भीती दूर होते
जे लोक सेक्स करण्यासाठी घाबरतात किंवा टाळतात, ते खासगी वेळेत यातच स्वमग्न असतात. तर सेक्सचा मनसोक्त आनंद घेणाऱ्या व्यक्ती नेहमी आनंदी असतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. डोक्यातील विचारान पूर्णविराम देतो सेक्स
सुख मिळते
सेक्स ही फक्त शरीराचीच नाही तर मानसिकही गरज आहे. लोकांना एकांत हवा सेक्स करताना तो त्याला मानसिकरित्या मिळतो. धावपळीच्या जीवनातून थोडा वेळ तुम्ही सुख अनुभवता. यामुळे ताणाव काही काळासाठी तरी दूर राहतो.
पुढील गोष्टी समजतात
अनेक जण लग्न ठरल्यावर सेक्सबाबत विचार करतात. यामुळे त्यांच्या मनात खूप काही शंका निर्माण होतात. तसेच ते चिंतेतही असतात. मात्र याचा आधीच अनुभव घेणारे याबाबतीत जोडीदाराला समजून घेतात.
तोटे
विवाहापूर्वी सेक्स करणे हे शारीरिक आणि भावनात्मकरित्या सुरक्षित मानले जात नाहीत.
कमी वयात असे संबंध ठेवल्यास त्याचा शारीरिक विकासावर परिणाम होतो शिवाय समाजिक संबंधावरही परिणाम होतो.
विवाहपूर्व सेक्स केल्याने एड्स यासारखे अनेक लैंगिक आजाराचे संक्रमण होऊ शकते.
सेक्स करताना काळजी नाही घेतल्यास गर्भधारणेचा धोकाही संभावतो. हा मानसिक तणावही निर्माण करतो.
Comments 3