अभिनेता सलमान खानच्या दबंग सिरींजमधील ‘दबंग ३’ हा चित्रपट २० डिसेंबर रोजी रिलीज होणार आहे. यापूर्वीच्या भागांप्रमाणेच तिसऱ्या भागातही सलमान चुलबुल पांडेच्या पोलीस वर्दीत दिसणार आहे.
पोलिसी खाक्याची दबंगगिरी, जबरदस्त डायलॉग, सोबतच कॉमेडीचा तडका अशी दबंग सिरींजमधील चित्रपटांची खासियत राहिली आहे. या चित्रपटाबाबतही तीच स्ट्रॅटेजी वापरण्यात आली आहे. परंतु आज आपण सलमानच्या “दबंग ४” चित्रपटासंबंधी सुरु असणाऱ्या एका वेगळ्याच चर्चेविषयी पाहणार आहोत.
सिक्युरिटी गार्डने लिहली “दबंग ४”ची कथा
सलमानचा “दबंग ३” अजून रिलीजही झाला नाही, तोवर त्याच्या “दबंग ४” ची चर्चा सुरु झाली आहे. चर्चेला कारणही तसेच आहे. कारण एका सिक्युरिटी गार्डने सलमानच्या “दबंग ४” चित्रपटासाठी कथा लिहली आहे.
आपल्या पगारातील पैसे वाचवून लवकरच आपली कथा सलमानला दाखवण्यासाठी तो सिक्युरिटी गार्ड मुंबईला जाणार आहे. “दबंग ३” चित्रपटाचे प्रमोशन आणि “बिग बॉस सिझन १३” यामध्ये व्यस्त असणारा सलमान या सिक्युरिटी गार्डची कथा जाणून घेणार का नाही ते पाहण्यासारखे आहे.
कोण आहे हा सिक्युरिटी गार्ड ?
जमशेदपूरच्या मानगो उलिडीह येथील रहिवासी महेंद्र कुमार हे वर्ल्ड बिझनेस स्कुल XLRI येथे सिक्युरिटी गार्ड आहेत. त्याठिकाणी असणाऱ्या ‘वलहल्ला’ नावाच्या एअर कार्यक्रमात “दबंग ३” चित्रपटाचे स्टॅन्ड उभे करण्यात आले होते, त्या स्टॅण्डने महेंद्रचे लक्ष वेधून घेतले. तिथून प्रेरणा घेऊनच त्यांनी “दबंग ४: द ब्लॅक शेडो” ही कथा लिहिली आहे.
महेंद्रला लहानपणापासून चित्रपटांची आवड आहे. मागच्या १० वर्षांपासून ते चित्रपट, नाटकांसाठी कथा लिहीत आहेत. आतापर्यंत त्यांनी डझनभर कथा आणि प्रोमो सॉंग्स लिहली आहेत. “आय लव्ह माय जमशेदपूर” “मैं इन्सान हूँ” या त्याच्या कथांचे लोकांनी चांगलेच कौतुक केले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.