दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केलेल्या साताऱ्याचा काय आहे एक्झिट पोल?

काल महाराष्ट्रात विधानसभेसाठी मतदान पार पडलं. आता सर्वाना २४ तारखेची प्रतीक्षा असून यामध्ये कोण बाजी मारते हे बघावे लागेल. निकाल लागण्यासाठी अजून १ दिवस मध्ये असला तरी मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोल हे समोर आले होते. एक्झिट पोलमध्ये भाजप शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे चित्र आहे. तर महाआघाडीच्या सुफडा साफ होईल असे चित्र आहे.

या निवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला. शहरी भागांमध्ये कमी मतदान झाले. तर ग्रामीण भागांमध्ये मोठ्या उत्साहात चांगले मतदान झाले. २८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवण्यासाठी १४५ जागांचा आकडा हा भाजप एकटाच गाठू शकतो इथपर्यंत काही एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे.

काँग्रेस राष्ट्रवादीला मात्र ४०-७५ जागांवर समाधान मानव लागेल असे एक्झिट पोलमधून चित्र समोर आले आहे. News18 Lokmat च्या एक्झिट पोल मध्ये पश्चिम महाराष्ट्र वगळता अन्य कुठेही आघाडीला जागांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.

राज्यात पुन्हा युतीचेच सरकार येईल असा अंदाज एक्झिट पोलमध्ये व्यक्त केला जात असला तरी काही बिग फाईटमध्ये मात्र भाजपला धक्का बसू शकतो असे यामधून समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस-राष्ट्रवादीतील अनेक नेत्यांनी भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या साताऱ्यातील दोन्ही राजेंनी भाजप प्रवेश केला होता. यात शिवेंद्रसिह हे विधानसभा निवडणूक लढवत होते. तर उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर लोकसभेसाठी ते भाजपकडून पोटनिवडणूक लढवत होते.

साताऱ्याचा एक्झिट पोल कोणाला देणार धक्का?

सर्वत्र दिग्गज नेत्यांनी पक्षांतर केल्याने राष्ट्रवादीला अनेक धक्के बसले. पण साताऱ्यातील उदयनराजेंच्या भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीला सर्वात मोठा धक्का मानला जात होता. उदयनराजे हे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा राष्ट्रवादीकडून खासदार झाले होते. उदयनराजेंनी राजीनामा दिल्यानंतर इथे काल पोटनीवडणुकीसाठी मतदान पार पडले.

साताऱ्यात शरद पवार यांची मुसळधार पावसात झालेली सभा वादळी ठरली होती. राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील यांना उमेदवारी देऊन उदयनराजेंना मोठं आव्हान निर्माण केलं होतं. तर विधानसभेसाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या विरोधात भाजपमधून आलेल्या दीपक पवार यांना उमेदवारी देऊन आव्हान दिले होते.

लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या निवडणुकीत या जागेवर अटीतटीची लढत झाल्याचा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे. दोन्ही राजे हे रेड झोनमध्ये असल्याचे एक्झिट पोलमध्ये अंदाज वर्तवण्यात आला आहे. कारण लोकसभा निवडणुकीत सातारा मतदारसंघात ६० टक्के मतदान झालं होतं. मात्र आता पोटनिवडणुकीत मतदानाची टक्केवारी जवळपास ६५ टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे.

वाढलेला टक्का हा विद्यमान आमदार खासदारांना धोक्याची घंटा मानला जातो. साताऱ्यातील हे वाढलेलं मतदान नेमकं कुणाच्या पारड्यात पडणार, यावर जय-पराजयाचं गणित ठरणार आहे. वाढलेलं मतदान गेल्या तीन टर्मपासून सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार असलेल्या उदयनराजे यांच्या अडचणी वाढवणार का, अशी चर्चा रंगत आहे. राजे बाजी मारणार की राष्ट्रवादी गड राखणार हे २४ तारखेलाच स्पष्ट होईल.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.