किचनमध्ये काम करणाऱ्या स्त्रीला कधी कमी समजू नका, एकेकाळी 5 हजार पगारावर काम करणाऱ्या सरिता पदमन आज त्याच किचनमुळे वर्षाला 1 कोटींची कमाई करतात. जाणून घेऊया सरिता पदमन यांचा संघर्षातून यशाचा प्रवास
सरिता’ज् किचन – संघर्षातून यशाचा प्रवास
सरिता पदमन यांचे “ सरिता’ज् किचन ” हे संघर्षातून यशाची उंची गाठणे याचे एक प्रेरणादायक उदाहरण आहे. स्वयंपाक कौशल्ये आणि संवाद कौशल्ये वापरून, “ सरिता’ज् किचन ” हे यूट्यूब चॅनेल ऑगस्ट २०१८ मध्ये सुरू केले आणि लाखो लोकांना मदत केली.
सरिता ११ वर्षांच्या असताना वडिलांच्या निधनाने घरची आर्थिक परिस्थिती बिकट झाली. आईने मुलांसाठी बाहेरची कामे, डबे आणि मेस सुरू केली. सरिता आईला मदत करण्यासाठी स्वयंपाक करायला शिकली. तिला लवकरच स्वयंपाक करण्याची आवड निर्माण झाली आणि ती एक उत्तम स्वयंपाकी बनली. सरिताला स्वयंपाकसोबतच वक्तृत्वाचीही आवड होती. पुढे यूट्यूब सुरू केल्यावर याच वक्तृत्व कौशल्यांचा तिला उपयोग झाला. तिच्याकडे विविध प्रकारच्या पाककृती बनवण्याची आणि त्यांची सुंदर व सर्जनशील पद्धतीने सादर करण्याची क्षमता देखील आहे त्यामुळे त्यांच्या यूट्यूब चॅनेलचे आता लाखो सदस्य आहेत.
सरिता यांनी शिक्षणासाठी पुण्याला आल्यानंतर छोटेमोठे कामं केली, एका डोमएस्टिक कॉल सेंटर मध्ये ३००० रुपये महिना काम केलं. ग्रॅजुएशन पूर्ण झाल्यावर इन्फोसिस सारख्या प्रतिष्ठित कंपनी मध्ये ट्रेनर म्हणून नोकरीला लागल्या आणि कंपनी मार्फतच यूके ला ही जाऊन आल्या.लग्नानंतर तिला तिच्या नेव्ही ऑफिसर नवऱ्यासोबात अनेकदा स्थलांतरित व्हावे लागले व त्यामुळे त्यांनी इन्फोसिस ची नोकरी सोडिली. या काळात त्यांनी सतत काही न काही शिकण्याची तयारी ठेवली व अनेक स्थानिक पदार्थ आणि त्या ठिकाणची खाद्यसंस्कृती शिकून घेतली.तसेच घरी न बसता काहीतरी काम करत राहिल्या. विषाखापट्टणम मध्ये असताना त्यांनी शिक्षिकेच प्रशिक्षण घेतल.
नवऱ्याने रिटायरमेंट घेतल्यानंतर ते पुण्यात आले. नवऱ्याने पुन्हा काम करण्यासाठी प्रोत्साहन दिलं म्हणून सरिताने एका शाळेत शिकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर त्यांच्या आईकडून मिळालेल्या स्वयंपाक कौशल्यांचा वापर करून केटरिंग व्यवसाय सुरू केला. अशा प्रकारे आवडीच्या दोन गोष्टी त्या एका वेळी करू लागल्या. सरिताच्या बहिणीने त्यांना स्वयंपाक कौशल्ये वापरून यूट्यूब चॅनल सुरू करण्याचा सल्ला दिला. सुरुवातीला सरिताला भीती वाटली, पण त्यांनी तो सल्ला मानला.
त्यांनी रेसिपीचा पहिला व्हिडिओ अपलोड केला आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानंतर त्यांनी गणेशोत्सवाच्या निमित्ताने उकडीच्या मोदकांचा व्हिडिओ अपलोड केला. त्याला उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला व काही दिवसातच १००० सबस्क्राइबर झाले आणि सरिताला विविध पाककृतींचे व्हिडिओ अपलोड करण्याचं प्रोत्साहन मिळालं. पुढे ४ महिन्यातच सदस्यसंख्या ५००० वर पोहोचली व त्यांचा यूट्यूब चॅनल यशस्वी झाला. यूट्यूब च पहिलं उत्तपन्न १ लाख ७५ हजार इतकं होतं.
केटरिंग व्यवसाय, शिक्षिकेची नोकरी, घर आणि युट्यूब चॅनेल या सगळ्या गोष्टी एकत्र सांभाळणे कठीण जात होते. म्हणून, तिने केटरिंग आणि नोकरी सोडली आणि युट्यूब चॅनेलवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केले. इन्फोसिसमधील तिच्या अनुभवामुळे, तिला चॅनेलसाठी चांगला प्लान आणि व्हिडिओंचा वेळापत्रक बनवण्यात मदत झाली. तिने बाकीचे सर्व कामे करूनही चॅनेल सुरू ठेवला, ज्यामुळे व्ह्यू आणि सबस्क्राइबर वाढत राहिले. चॅनेलचे 9 लाख सदस्य होईपर्यंत, तिने एकटीने व्हिडिओ बनवणे, एडिट करणे, पोस्ट करणे आणि इतर सर्व कामे केली.
सरितास् किचन आता एक यशस्वी व्यवसाय बनले आहे. त्यासाठी एक वेगळा स्टुडिओ आहे आणि विविध गोष्टींवर काम करणारी टीम आहे. 3,000 रुपयांपासून 1 कोटी रुपयांच्या टर्नओव्हरपर्यंतचा प्रवास सरिताच्या जिद्द, कठोर परिश्रम आणि मूलभूत कौशल्यांचा विकास यामुळे शक्य झाला.
सरिता पदमन यांच्या यशाची कहाणी हे सिद्ध करते की आपल्या आवडी आणि कौशल्ये ही आपल्या यशाची गुरुकिल्ली असू शकतात.