काय आहे राज्यपाल रामलाल यांचा किस्सा, संजय राऊतांना का आली त्यांची आठवण ?

शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरुन “राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये. का कळत नाही पण रामलाल नामक निर्लज्ज राज्यपालांची अचानक आठवण येत आहे. समझने वालों को इशारा काफी है !” अशी पोस्ट केली आहे. अर्थातच त्यांचा प्रमुख रोख हा महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच होता.

काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या सामना वर्तमानपत्राच्या अग्रलेखातूनही महाविकासआघाडी सरकारविरुद्ध भाजप राज्यपाल भवनातून काड्या करत असल्याचे म्हटले होते. कोण आहेत हे राज्यपाल रामलाल आणि संजय राऊतांना का आली त्यांची आठवण ?

कोण आहेत राज्यपाल रामलाल ?

रामलाल यांचे पूर्ण नाव रामलाल ठाकूर असे होते. ते काँग्रेसचे नेते होते. ते १९७७ आणि १९८०-८३ असे दोन वेळा ते हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री होते. त्यांनतर १९८३ मध्ये त्यांची निवड आंध्रप्रदेशचे राज्यपाल म्हणून करण्यात आली होती. त्यावेळी एनटी रामाराव आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री होते.

१९८४ मध्ये एनटी रामाराव उपचार घेण्यासाठी सात दिवसांसाठी अमेरिकेला गेले असताना इकडे त्यांचे सरकार बरखास्त करुन रामलाल ठाकूर यांनी त्यांच्याच मंत्रिमंडळातील बंडखोर अर्थमंत्री एन.भास्करराव यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली होती. त्यांनतर या निर्णयावर जोरदार टीका झाली आणि इंदिरा गांधी सरकारने शंकर दयाळ शर्मा यांना राज्यपाल बनवले. त्यानंतर एनटी रामाराव पुन्हा मुख्यमंत्री बनले.

संजय राऊतांना राज्यपाल रामलालची आठवण का आली ?

महाराष्ट्रात एका बाजूला कोरोनासारखे संकट असताना दुसऱ्या बाजूला राजकीय वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या एकही सभागृहाचे सदस्य नसल्याने राज्यघटनेच्या नियमानुसार त्यांना ६ महिन्यांत कुठल्याही एका सभागृहात निवडून जाणे आवश्य आहे. परंतु कोरोनामुळे निवडणूक आयोगाने सर्व निवडणुका पुढे ढकलल्या आहेत.

अशात उद्धव ठाकरेंना मिळालेला ६ महिन्यांचा एवढीही संपत आला आहे. अशात मंत्रिमंडळाने राज्यपाल कोट्यातून उद्धव ठाकरेंना आमदार म्हणून विधानपरिषदेत पाठवण्याची शिफारस केली आहे. परंतु राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे दिरंगाई करत असल्याचा आरोप करुन संजय राऊत यांनी त्यांची तुलना राज्यपाल रामलाल यांच्याशी केली आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.