संजय दत्त हा बॉलिवूडमधील असा अभिनेता आहे ज्याचे कारनामे कुणापासून लपून राहिले नाहीत. त्याच्या जीवनावर आधारित “संजू” नावाचा चित्रपटही येऊन गेला.पण संजय दत्तचे किस्सेच इतके आहेत की ते एका चित्रपटात बसणार नाहीत, त्यासाठी एखादे पुस्तकाचं लिहावे लागेल. आता हेच बघा ना संजू चित्रपटावेळी दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या लव्ह लाईफबद्दल बोलताना त्याने सांगितले की “मला ३०८ गर्लफ्रेंड आहेत.”
इथे लोकांना एक सांभाळायला मुश्किल असते आणि या पठ्ठ्याने ३०८….असो ! संजय दत्तच्या ३०८ गर्लफ्रेंड कोण हे जाणून घेण्याची जशी तुम्हाला उत्सुकता आहे, तशीच आम्हालाही आहे. पण कशाबशा आठ गर्लफ्रेंडबद्दल माहिती उपलब्ध झाली आहे. बाकीच्या ३०० गर्लफ्रेंड संजय दत्तच्या तरी लक्षात आहेत का नाहीत कुणास ठाऊक. पाहूया संजय दत्तच्या ८ गर्लफ्रेंडविषयी…
१) टिना मुनीम : टिना मुनीम कोण होती हे नंतर सांगतो, त्याआधी ती संजूबाबाची पहिली गर्लफ्रेंड होती हे वाचा. तीन आणि संजय हे दोघे लहानपणापासूनच एकमेकांचे मित्र होते. १९८१ साली “रॉकी” चित्रपटाच्या माध्यमातून दोघांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हाच दोघांमध्ये प्रेम जुळले. परंतु संजूबाबाच्या दारु आणि ड्रग्सच्या सवयीमुळे दोघांचे नाते फार काळ टिकले नाही आणि त्यांच्यात ब्रेकअप झाला. त्यानंतर काही काळ राजेश खन्नावर टिनाचा जीव जडला होता. पण नंतर टिनाने लग्न केले आणि ती टिना अनिल अंबानी बनली.
२) रिचा शर्मा : संजयने रचला पहिल्यांदा एका लोकल मॅगझिनमध्ये पहिले आणि तिच्यावर भाळला. त्यानंतर दोघेजण एका चित्रपटाच्या निमित्ताने भेटले. संजयने रिचाचा फोन नंबर घेतला आणि तिला सतत फोन करायला लागला. सुरुवातीला रिचाने संजयसोबत डेटवर जायला नकार दिला, पण नंतर दोघे जवळ आले. “आग ही आग” चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान संजयने तिला प्रपोज केले आणि १९८७ मध्ये दोघांनी लग्न केले. त्यांना त्रिशाला नावाची मुलगी झाली. १९९६ मध्ये रिचा ब्रेन ट्युमरमुळे मरण पावली.
३) माधुरी दीक्षित : नव्वदीच्या दशकात संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांचे अफेअर चर्चेचा विषय बनले होते. दोघांनी एकत्रित अनेक चित्रपट केले. ते दोघे लग्नही करणार होते, पण १९९३ साली टाडाने संजय दत्तला अटक केली आणि दोघांच्या लग्नाची योजना रखडली.
४) रेखा : तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण संजय दत्त गर्लफ्रेंडच्या बाबतीत खूप माहीर खिलाडी होता. आपण फक्त अमिताभ बच्चन सोबतच रेखाच्या अफेअरच्या चर्चा वाचल्या आहेत, पण संजुबाबा देखील रेखाला डेट करायचा. असेही बोलले गेले की दोघांनी गुप्तरित्या लग्न केले आहे आणि रेखा संजयच्या नावाचे कुंकू माळते.
५) रिया पिल्लई : माधुरी सोबतचा संपर्क तुटल्यानंतर संजय दत्त आणि रिया पिल्लई एकमेकांच्या जवळ आले. १९९८ मध्ये दोघांनी लग्नही केले. पण त्यांचेही नाते फारकाळ टिकले नाही. बरीच वर्षे विभक्त राहिल्यानंतर २००५ साली दोघांमध्ये घटस्फोट झाला.
६) लिसा रे : लिसा रे ही संजयच्या अनेक गर्लफ्रेंडपैकी एक आहे. सततच्या व्यावसायिक आणि खाजगी जीवनातील चढउतारानंतर संजय दत्तला लिसा रे हिच्या रुपाने मानसिक शांती मिळाली. संजय दत्तच्या अडचणीच्या काळात लिसा त्याच्या पाठीशी उभी राहिली.
७) नादिया दुर्रानी : नादिया दुर्रानी नावाची बेली डान्सर अनपेक्षितरित्या संजयच्या आयुष्यात आली. अनेकजण सांगतात की नादियाच्या लग्नापूर्वी संजय आणि तिचे अफेअर होते. संजय आणि रिया यांच्या लग्नानंतर नादिया संजयपासून दूर झाली.
८) मान्यता : मान्यताचे मूळ नाव दिलनवाज शेख होते, ती सी ग्रेड चित्रपटात काम करायची. संजय दत्तने मान्यताच्या “Lovers Like Us” या सी ग्रेड चित्रपटाचे राईट्स खरेदी करतेवेळी दोघांची पहिली भेट झाली. त्यानंतर मान्यता संजुबाबाकडे भेटायला जाऊ लागली. संजय दत्त स्वतःच्या हाताने जेवण बनवून देण्यापासून त्याच्या अडचणीच्या काळात मान्यता सोबत उभी राहिली. दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि २००८ मध्ये त्यांनी लग्न केले.