भारतीय क्रीडा क्षेत्रात सानिया मिर्झा आणि मोहम्मद अजहरुद्दीन ही नावे आपल्या सर्वांच्या परिचयाची आहेत. सानियाने भारताची स्टार टेनिस खेळाडू म्हणून तर अझरुद्दीनने भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून मैदान गाजवली आहेत. सानियाने पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार शोएब मलिकशी लग्न केले. तर अजहरुद्दीनने आधी नूरीन सोबत लग्न केले आणि त्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री संगीता बिजलानीसोबत लग्न केले. आता एका वेगळ्या कारणाने सानिया मिर्झा आणि मोहम्मद अजहरुद्दीन एकत्र येत आहेत.
काय आहे सानिया आणि अझरुद्दीन एकत्र येण्याचे कारण ?
सानिया मिर्झा आणि मोहम्मद अजहरुद्दीन एका लग्नाच्या कारणाने एकत्र येणार आहेत, म्हणजेच आता ते एकमेकांचे नातेवाईक बनणार आहेत. बातमी अशी आहे की मोहम्मद अझरुद्दीनचा मुलगा असद आणि सानिया मिर्झाची बहीण अनमी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. लग्नाची सर्व कामे सुरू झाली आहेत. सानिया आणि अनमच्या फोटोनी सोशल मीडिया भरलेला आहे. दोघींनीही मेहंदीची छायाचित्रे इंस्टाग्रामवर शेअर केली आहेत.
असद आणि अनम यांच्याबद्दल
असद हा मोहम्मद अझरुद्दीनला पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा आहे. सानियाची बहीण अनम मिर्झा ही एक फॅशन स्टायलिस्ट आहे. अनमने नोव्हेंबर २०१६ मध्ये अकबर राशिद नावाच्या व्यावसायिकाशी लग्न केले होते. पण गेल्या वर्षी दोघांचाही घटस्फोट झाला. त्यानंतर अनम आणि असद एकमेकांना डेट करत होते. आता काही दिवसात त्यांचे लग्न होणार आहे. लग्नसाठी सानिया आणि अझरुद्दीन या लग्नाची पत्रिका देण्यासाठी मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना भेटून आले आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.