सोशल मीडियामुळे कधी कोण रातोरात स्टार होईल हे सांगता येत नाही. सध्या देशभरात एकच चर्चा मोठ्या प्रमाणात चालू आहे. ती म्हणजे रेल्वे स्टेशनवर गाणे गाणाऱ्या रानू मंडलची. कोलकात्यातील रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या रानू मंडल यांच्या आयुष्याला सोशल मीडियामुळे खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली.
रानू मंडल यांचा आवाज एवढा सुरेख आहे कि जणू त्यांना दैवी देणगी मिळाली आहे. त्या कोलकात्यात रेल्वे स्टेशनवर गाणे गायच्या. सोशल मीडियाच्या बळावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओतून रानू यांचा आवाज सर्वांपर्यंत पोहोचला, ज्यानंतर त्यांच्या आवाजाची दखल बॉलिवूडमधील संगीतकार हिमेश रेशमिया यानेही घेतली.
रानू यांनी गायलेल्या ‘तेरी मेरी कहानी’ या गाण्यंच्या रेक़ॉर्डिंगचा व्हिडिओही हिमेशने पोस्ट केला. एका खऱ्या कलाकाराला संधी दिल्याबद्दल नेटकऱ्यांनी आणि अनेकांनीच हिमेशची प्रशंसा केली. या कृतीसाठी त्याची पाठ थोपटली.
कोलकाता येथील एका रेल्वे स्थानकावर ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाऊन रानू यांनी साऱ्यांना थक्क केलं. देशभरातून त्यानंतर रानू यांच्यावर कौतुकाचा आणि मदतीचा वर्षाव होत आहे. या मदतीत आता एक मोठं नाव जोडलं गेल्याच वृत्त आहे. हि व्यक्ती आहे बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान.
सलमानच्या वडिलांच्या एका सल्ल्यावरुनच हिमेशने रानू यांना अत्यंत महत्त्वाची संधी दिली. स्वतः हिमेशने हे श्रेय त्यांना दिले होते. ज्यामागोमाग आता असं म्हटलं जात आहे, की रानू यांना सलमानने चक्क एक महागडं घर भेट स्वरुपात दिलं आहे.
काल दिवसभर याबाबत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु होत्या. याविषयी दैनिक जागरणने वृत्त प्रकाशित केले आहे. दैनिक जागरणाच्या वृत्तानुसार रानू यांसाठी सलमानने सढळ हाताने मदत दिली असून त्यांना एक घर भेट दिलं आहे. या घराची किंमत ५५ लाख रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. मुख्य म्हणजे सलमानकडून याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
पण सलमान नेहमीच मदत करण्यासाठी पुढे असतो. त्यामुळे याविषयी अधिकृत माहिती समोर आली नसली तरी रानू यांना सलमानने मदत केली असेल असा चाहत्यांना विश्वास आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.