दिनांक ७।१०।१५ रोजी शिर्डी येथील साईबाबांच्या मुर्तीला ६१ वर्षे पुर्ण झाली. शिर्डी संस्थानच्या ईतीहासात या दिवसाला खुपच महत्व आहे. बाबांच्या महासमाधीनंतर ३५ वर्षांनी हि मुर्ती मंदिरात प्रस्थापीत केली गेली. त्याचि विलक्षण कथा खालीलप्रमाणे. १९५२ मधे पांढरा शूभ्र ईटालीयन मार्बलचा एक मोठा तुकडा ईटालीहुन मूंबई डाॅकयार्ड मधे आला.
कोणी पाठवला ?कोणी मागवला ? कोणालाच माहीती नव्हती. ताबा घेणारा कोणी नाही म्हणुन डाॅकयार्ड अधीकार्यांानी त्याचा लिलाव काढला,ज्याने हा लिलाव घेतला त्याने हा तुकडा शिर्डि संस्धानला दिला. अतीशय मौल्यवान असा तो संगमरवर पाहुन शिर्डी संस्थानने त्याची मुर्ती बनवायची ठरवले ! हे काम त्यांनी मूंबईचे प्रसीद्ध शिल्पकार श्री बाळाजी वसंतराव तालीम यांना दिले.
आपल्या कामात निष्णात असलेल्या तालीम यांनी या मुर्तीसाठी लागणारी हत्यारे,त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे लोहार व सुतार यांच्याकडून बनवुन घेतली. सुरुवातीला त्यांनी बाबांचि मातीची माॅडेल मुर्ती बनवली व कामाला सुरुवात केली. बाबांच्या चेहेरे पट्टीशी जुळणारी हुबेहुब मूर्ती त्यांना बनवता येत नव्हती कारण त्यांच्याकडे बाबांच्या चेहर्याणचे पुर्ण तपशील नव्हते जे काहि होते ते एक जुना ब्लॅक व्हाईट फोटो होता. त्यावरुनच त्यांना हे काम करायचे होते!
शेवटी त्यांनी कळकळीने बाबांची प्रार्थना केली व म्हणाले”बाबा, तुम्ही मला दर्शन दिलेत तरच मला ही मुर्ती घडवता येईल आणी असं झाल तरच हि मुर्ती भक्तांना आनंद देउल व त्यांची भक्ती वाढवील. आणी काय सांगावं! एके दिवशी सकाळी सात वाजता तालीम आपल्या स्टुडीओत गेले असताना त्यांनी एक दिव्य प्रकाश पाहीला व त्या प्रकाशात बाबा प्रकट झाले.
बाबांनी तालीमांच्या सर्व शंका दुर केल्या व आपल्या चेहेर्यााचे विविध कोनातुन दर्शन घडवले. तालीमांनी ते सर्व लक्षात ठेवल व सर्व तपशील स्मरणात ठेवले. ईकडे शिर्डी संस्थानने मातीच्या माॅडेल मुर्तीला मान्यता दिली व त्याच्या अनुषंगाने मुर्ति घडवण्यास सांगीतले. १९५४ साली मुर्तीचे काम अंतीम टप्य्यात असताना,त्या मुर्तीत हवेची एक मोठी पोकळी आढळून आली.
कमकुवत असा तो भाग काढणे आवश्यक होते, हा भाग बाबांच्या डाव्या(दुमडलेल्या)पायाच्या गुडघ्याखालचा होता. पण अस केल असता तर कदाचीत मुर्तीच्या आवश्यक भागातला काही भाग पण नीघाला असता तर ती मुर्ती भग्न झाल्यामूळे पुजनीय राहीली नसती. काम थांबल, बाळाजी तो अनावश्यक भाग काढुन टाकायला तयार होईनात.
परत त्यांनी बाबांना प्रार्थना केली,”बाबा,मुर्ती तयार आहे,माझ्यावर कृपा करा” तेवढ्यात त्यांच्या अंतर्मनातुन आवाज आला,”कामासुरु ठेव” बाळाजींनी कारागीरना तो भाग काढण्यास सांगीतले,पण ते तयार होईनात,त्यांना भीती वाटत होती की तो गुडघ्याखालचा भाग ढासळेल!
शेवटी स्वतः तालीमांनी छीन्नी हातोडा हातात घेतला व तो भाग काढायला सुरुवात केली. त्यांच्या आश्चर्याने तो भाग सहजच बाहेर आला व मुर्तीहि शाबुत राहीली,बाळाजी नाचायलाच लागले त्यांनी लगेच मिठाई आणून वाटली. अत्यंत सजीव वाटणार्यात त्या मुर्तीची गावातुन समारंभपुर्वक मिरवणुक काढली. लक्ष्मीबाई शिंदे व स्वामी शरणानंद जे बाबांचे जवळचे भक्त होतेत्यांनी मुर्तीच्या हुबेहुबपणाबद्दल समाधान व्यक्त केले व जणु “बाबाच परत आपल्यात आले हे उद्गार काढले”
हि मुर्ती घडवण्याचे काम चालु असता एकदाबाबांनी बाळाजींना दर्शन दीले व या मुर्तीनंतर तु अन्य कुठलीही मुर्ती बनवणार नाहिस असे सांगीतले. बाळाजींची ही मुर्ती अखेरची ठरली. शेवटि वयाच्या ८२ व्या वर्षी वीस डीसेंबर ला तालीमांनी अखेरचा श्वास घेतला..
साभार:- WHATSAPP VIRAL STORY