सचिन तेंडुलकरने १४ डिसेंबर रोजी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांकडे एक मदत मागितली होती. आपल्या चाहत्यांकडे त्याने एका व्यक्तीसोबत त्याची भेट घालून देण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. सचिनच्या आवाहनाला अल्पावधीतच लोकांनी प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. बरेचजण सांगायला लागले की ती व्यक्ती आपणच आहोत. तर अनेकांनी आपण त्या व्यक्तीला ओळखत असल्याचा दावा केला. ट्विटरवर मुन नावाच्या एका व्यक्तीने सचिन ज्या व्यक्तीबद्दल बोल्ट आहे, ती व्यक्ती आपले चुलते असल्याचे सांगितले. पुराव्यादाखल त्याने सचिनचा ऑटोग्राफही दाखवला आणि आपल्या चुलत्याचा फोटोही ट्विट केला. एका तमिळ न्यूज चॅनेलने एका व्यक्तीची मुलाखत घेतली होती, ज्यात त्या व्यक्तीने दावा केला होता की आपणच सचिनला सल्ला दिला होता.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
१४ डिसेंबर रोजी सचिनने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ ट्विट केला होता. त्या व्हिडिओमध्ये सचिनने चेन्नई येथे खेळल्या गेलेल्या एका कसोटी सामन्यांदरम्यानची आठवण सांगितली आहे. त्यात सचिन सांगतो की, “मी एक कॉफी मागवली होती. एक वेटर माझ्या खोलीत आला आणि त्याने मला सांगितले की, त्याला माझ्यासोबत क्रिकेटबद्दल चर्चा करायची आहे. त्या वेटरने मला सांगितले की जेव्हा खेळताना तुम्ही आपण आर्म गार्ड घालता, तेव्हा तुमच्या बॅटचे स्विंग बदलते.”
या विषयावर सचिनशी पूर्वी कोणी बोलले नव्हते. सचिनच्या म्हणण्यानुसार, ही गोष्ट लक्षात आणून देणारा तो एकमेव व्यक्ती होता. जवळपास २५ वर्षांच्या क्रिकेट कारकीर्दीत सचिनने त्याच्या फलंदाजीच्या तंत्रात अनेक बदल केले. पण एका सामान्य माणसाच्या सूचनेनुसार सचिनने केलेला हा बहुधा एकमेव बदल होता. सचिनच्या या व्हिडिओला प्रतिसाद म्हणून अनेकांनी ती व्यक्ती आपणच असल्याचे किंवा त्या व्यक्तीला आपण ओळखत असल्याचा दावा केला होता. आता सचिनला खरोखरच त्या व्यक्तीपर्यंत कोण घेऊन जातंय का ते पाहण्यासारखे आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.