गंगा पृथ्वीवर अवतरली याची पुराणात आख्यायिका सर्वाना माहिती आहे. या दिवसाला गंगा दसरा म्हणून साजरा केला जातो. आणि या दिवशी गंगेत अंघोळ करण्याचे वेगळे महत्व आहे. या दिवशी गंगेत आंघोळ केल्याने १० पाप दूर होतात असे सांगितल्या जाते. या सोबतच पूजा आणी दान केल्यास मनातील इच्छा पूर्ण होतात असे सांगितल्या जाते. परंतु ग्रंथात गंगा स्नान करण्याचे काही नियम सांगितले आहे हे आपणास माहिती नाही.
गंगा स्नान केल्याने हे १० दहा पाप दूर होतात..
गंगा स्नान केल्याने पुण्य मिळते आपणास तिथे जाता नाही आले तर घरातील पाण्यात गंगेच पाणी घेऊन आंघोळ करावी असे सांगितल्या जाते. स्मृतिग्रंथात या दहा पापाचे वर्णन केले आहे. हे पाप पुढील प्रमाणे आहे कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक पापमध्ये चोरी, हिंसा, परस्त्री गमन हे ३ प्रकारचे कायिक म्हणजे शारीरिक पाप आहे.
कठोर बोलणे, पाठीमागे निंदा करणे, खोटे बोलणे, बिन कमी वायफळ करणे हे चार प्रकारचे वाचिक पाप आहे. या सोबतच दुसर्याचे धन चोरायचा मनात विचार करणे, मनात एखाद्या सोबत खराब करायचा विचार आणणे, खोट्या गोष्टीचा हट्ट करणे हे तीन प्रकारचे मानसिक पाप आहे.
गंगा स्नानाचे नियम आहे खालील प्रमाणे
गंगा स्नान करण्या अगोदर अंघोळ करून घेणे. गंगा नदीत फक्त डुबकी घ्यायची. पवित्र नदीत शरीरावरील मैल काढू नये. गंगा नदीत मनुष्याची अशुद्धी जायला नको. अंघोळ करताना शरीर हाताने घासावे नाही. गंगा स्नान केल्यावर शरीर कपड्याने पुसू नये.
पाण्याला शरीरावर सुकू द्यावे. म्र्त्यू कि जन्म सुतकाच्या वेळेस सुध्दा गंगेत अंघोळ करता येते. परंतु महिलांनी मासिक पाळीच्या वेळेस गंगेत स्नान करू नये. घरी अंघोळ करताना गंगेच्या पाण्याच्या काही थेंब पाण्यात टाकावे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.