वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस, आता देतात गरीब विद्यार्थ्यांना एमपीएससी चे मोफत शिक्षण

वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी एम्स सारख्या प्रतिष्ठित मेडिकल संस्थेच्या प्रवेश परीक्षेत यश संपादित केले. मेडिकल चे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अवघ्या 22 व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आयएएस परीक्षा ही पास केली. नंतर 2 वर्षांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली. आता ते गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत क्लासेस घेतात. ते सध्या सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकवतात. ही एका आपल्या सारख्याच सामान्य व्यक्तीची कथा आहे. ही प्रेरणादायी कथा आहे राजस्थान च्या रोमन सैनी यांची. रोमन यांनी त्यांच्या आयुष्यात ते करू इच्छिणाऱ्या प्रत्येक कामात यश संपादित केले आहे. त्यांच्या आयुष्यात त्यांना जे मनापासून आवडायचं तेच ते करायचे, हेच त्यांच्या यशाचे कारण होते. त्यांचं देशातील प्रत्येक तरुणांचं भविष्य उज्वल करण्याचं स्वप्न आहे. त्यांनी आपल्या याच स्वप्नाला पूर्ण करण्यासाठी रोमन यांनी आयएएस ची नोकरीही सोडली आहे. आता रोमन त्यांचा पूर्ण वेळ शिक्षणातील नवीन स्टार्टअप अकॅडमीला देणार आहेत.

Roman

सोपा नव्हता इथपर्यंतचा प्रवास

IAS roman saini

रोमन यांची आई एक गृहिणी तर वडील हे इंजिनीअर आहेत. एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाला देशातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षेत यश प्राप्त करणे दिसतं तेवढे सोपं नव्हतं. रोमन आधुनिक भारतातील त्या तरुणांचे नेतृत्व करतात ज्या तरुणांचा खडतर प्रवासातून यश संपादित करणे हा छंद असतो. रोमन हे डॉक्टरी पेशात असोत की आयएएस अधिकारी, ते समाजातील प्रत्येक घटकाला मदत देण्याचा प्रयत्न करत असतात. ते तरुणांना सांगतात की त्यांना परीक्षा संबंधित काही अडचणी असो की अन्य कुठल्याही समस्या असो तर रोमन यांच्याशी त्यांच्या फेसबुक च्या माध्यमातून संपर्क साधू शकता.

शाळेत होते सर्वसामान्य विद्यार्थी, शिक्षणाची बिल्कुल नव्हती आवड

Roman saini

रोमन यांचं यश पाहून आपल्याला असे वाटेल की ते शाळेत एक टॉपर विद्यार्थी असणार. पण असे नाहीये, रोमन शाळेत अत्यंत सामन्य विद्यार्थी होते, आणि मजेशीर गोष्ट म्हणजे त्यांना शिक्षणाची बिल्कुल आवड नव्हती. त्यांच्या घरातील परिस्थिती ही खूप काही चांगली नव्हती, त्यांनी आपल्या घरातील परिस्थितीचा शिक्षणावर थोडा ही परिणाम होऊ दिला नाही. जयपूर च्या या युवकाने त्यांनी मनापासून केलेल्या प्रत्येक क्षेत्रात यश संपादित केले आहे.

16 व्या वर्षी डॉक्टर, 22 व्या वर्षी आयएएस झालेले रोमन आता आहेत एक यशस्वी उद्योजक

Roman saini

रोमन यांचे वडील रोमन यांच्यावर लहानपणा पासून नाराज होते. ते आपल्या वडिलांसोबत कोणत्याही सामाजिक कार्यक्रमात भाग घेत नसत. आपल्या मित्रांची वाढदिवस पार्टी असो वा कोणी नातेवाईकांचा लग्न समारंभ, रोमन नेहमी या गोष्टीपासून दूर राहत असत. रोमन हे त्यांच्याच एका दुनियेत रमलेले असायचे, व त्यातच त्यांना आनंद मिळत असे. त्यांनी आपल्या आयुष्यात त्यांना आवश्यक वाटणाऱ्या गोष्टीनाच स्थान दिले. आवश्यक न वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रोमन यांनी कधीही आपला वेळ वाया घातला नाही. याच कारणामुळे त्यांनी निर्भेळ यश संपादित केले व ते आता लोकांच्या कामास येण्यासाठी पात्र ठरत आहेत.

नवीन गोष्टी शिकण्यासाठी रोमन यांना नाही वाटत लाज

Roman saini

शाळेत जेव्हा शिक्षक शिकवायचे तेव्हा रोमन यांना शाळेतून पळून जाण्याची इच्छा होत असे. त्यांना वाटायचे की शाळेत चांगले मार्क्स मिळवणेच सर्वकाही नाहीये. फक्त नावाला परीक्षा पास होण्यातच ते सहमत असायचे. बायोलॉजी मध्ये मजा येत असे म्हणून रोमन यांनी ची परीक्षा दिली. मनापासून अभ्यास केला आणि त्यांनी यश ही संपादन केले. सिव्हिल सर्व्हिस मध्ये जाण्याचे कारणही तेच होते, त्यांना त्या विषयाची आवड होती. लहानपणापासूनच रोमन यांना नवीन गोष्टी शिकण्याची आवड होती. महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना नवीन गोष्टी शिकण्यासाठी कोणतीही लाज वाटत नसे.

शाळेत मित्रांसोबत मिळून बनवली नवीन संकल्पना

Roman saini

रोमन आणि त्यांचे मित्र गौरव गुंजाल हे सोबतच ट्यूशन ला जात असत. त्यावेळेस त्यांच्या मनात ही कल्पना आली की प्रत्येक विद्यार्थ्यांला चांगले ट्युशन का नाही मिळू शकत. मग त्यांनी एक अकॅडमी सुरू करण्याचा निर्णय घेतला. अनअकॅडमी ची सुरुवात युट्युब पासून केली. जे की रोमन यांचे मित्र गौरव यांनी बनवले होते. त्यांनी आता पर्यंत 10 लाखांहून अधिक व्हिडीओ प्रसारित केले आहेत. ज्यातून 5 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना फायदा झाला आहे. आता पर्यंत 25 शिक्षक त्यांच्या सोबत जोडले गेले आहेत.

4 मित्रांनी मिळून चालू केली अन अकॅडमी

Roman saini with friends

अन अकॅडमी सुरू करण्यासाठी रोमन यांनी आयएएस ची नोकरी सोडून दिली होती तर गौरव यांनी ऑनलाईन रियल इस्टेट कंपनी फ्लॅटचॅट च्या सीईओपदाचा त्याग केला.या दोघांनी त्यांचे मित्र हेमेश आणि सचिन गुप्ता यांनी मिळून अन अकॅडमी सुरू केली. अन नावाने त्यांनी वेब प्लॅटफॉर्म तयार केला आहे. लवकरच अन अकॅडमी चे स्मार्टफोन ऍप लाँच केले जाणार आहे, ज्यामध्ये प्रत्येक जण स्वतः अभ्यासाचे व्हिडीओ बनवण्यास सक्षम बनेल. या व्हिडीओच्या व्युज वर शिक्षकांची लोकप्रियता ठरवली जाणार आहे. हे व्हिडिओ आणि ऍप सर्वांसाठी मोफत असणार आहे.

सोशल नेटवर्किंग वर हिट आहेत रोमन

Roman saini

रोमन यांच्या व्हीडीओ आणि भाषणांना सोशल नेटवर्किंग साईट्सवर सध्या हजारो व्युज मिळतात. या व्हिडीओ आणि भाषणात ते विद्यार्थ्यांना अशा गोष्टी शिवततात ज्यामुळे ते त्यांच्या आयुष्यात भरारी घेण्यासाठी उपयोगी ठरतील. या वेबसाईटच्या माध्यमातून रोमन देशभरातील यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असतात. मार्गदर्शनाचे अनेक व्हिडीओ रोमन यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. या व्हिडीओमध्ये रोमन विद्यार्थ्यांना अनेक विषयांचे मार्गदर्शन करतात व त्यांच्या प्रश्नाचे उत्तरही देत असतात. रोमन याना कधी वेळ मिळाला तर ते या परीक्षार्थींना भेटत ही असतात.

हा लेख आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका…

वाचा रोजंदारी शेतमजूर ते अमेरिकेत आयटी कंपनी सिइओ ज्योती रेड्डीचा संघर्षमय प्रवास..

वाचा आईने मजुरी केली तेच शेत विकत घेणारा उद्योजकाची यशोगाथा…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.