लग्झरी कारचा विषय निघाला तर रॉल्स रॉयस हे नाव आपोआप प्रत्येकाच्या डोळ्यांसमोर येते. रॉल्स रॉयस ही ब्रिटन देशातील लग्झरी ऑटोमोबाईल कंपनी आहे. त्याची मालकी BMW AG यांच्याकडे आहे.
१९०४ मध्ये रॉल्स रॉयसची स्थापना चार्ल्स रॉल्स आणि हेन्री रॉयस यांनी केली होती. रॉल्स रॉयस कंपनी लग्झरी कार आणि गुणवत्तेबाबत जगप्रसिद्ध आहे. त्या कंपनीची कार आपल्याकडे असणे हे प्रत्येक श्रीमंतांचे स्वप्न असते.
रॉल्स रॉयसची भारतातील सर्वात महाग कार
रॉल्स रॉयसने भारतात त्यांची सर्वात महागडी कार “कलीनन” लाँच केली आहे. या कारची किंमत ६.९५ कोटी रुपये आहे. रॉल्स रॉयस कंपनीकडून कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या आवडीनुसार कारचे डिझाइन तयार करण्यात येते.
रॉल्स रॉयसने आतापर्यंत भारतात ६ कार लाँच केल्या होत्या. त्यामध्ये Rolls-Royce Phantom VIII, Rolls-Royce Ghost Series II, Rolls-Royce Wraith, Rolls-Royce Dawn, Rolls-Royce Phantom Coupe आणि Rolls-Royce Drophead Coupe या कारचा समावेश आहे.
भारतात केवळ या तीन लोकांकडे आहे रॉल्स रॉयस कलीनन कार
रॉल्स रॉयस कार म्हणजे भारतात एक स्टेटस बनले आहे. रॉल्स रॉयस कलीनन कारचे नाव जगातील सर्वात मोठा हिरा “कलीनन” वरून घेण्यात आले आहे. ही कार भारतात लाँच झाली खरी, पण तीची किंमत पाहून जास्त लोकांनी ही कार घेण्याचे धाडस केले नाही.
भारतामध्ये या कारचे पहिले ग्राहक रिलायन्स उद्योगसमूहाचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी, दुसरे ग्राहक टी-सीरिजचे मालक भूषण कुमार आहेत तर या कारचा तिसरा ग्राहक बॉलिवूड अभिनेता सिंघम अजय देवगण आहे. अभिनी सोहन रॉय यांनीही हि गाडी खरेदी केली होती. त्या दुबईस्थित व्यावसायिकाच्या पत्नी आहेत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.