१९९१ मध्ये अजय देवगणच्या “फूल और कांटे” या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री मधु सध्या चर्चेत आली आहे. “खली बली” या हॉरर कॉमेडी चित्रपटातुन मधु तब्बल ८ वर्षानंतर बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे.
“लव्ह यू … मिस्टर कलाकार” हा तीचा शेवटचा हिंदी चित्रपट होता. मधुने अनेक हिंदी आणि दक्षिण भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. मणिरत्नमच्या “रोजा” चित्रपटातील मधुची भूमिका आजही कित्येकांच्या लक्षात आहे.
बॉलिवूडमधून का गायब झाली होती मधू ?
मधु मूळची तमिळ आहे. ती हेमा मालिनीची भाची आणि ईशा देओलच्या आत्याची मुलगी आहे. खरं तर मातृत्वावर लक्ष केंद्रित करण्यासाठी मधुने चित्रपटातून ब्रेक घेतला होता.
तिच्या बॉलिवूड कमबॅकवर झालेल्या एका मुलाखतीत मधुने सांगितले की, “लव्ह यू … मिस्टर कलाकार”च्या आधी मी ब्रेक घेतला, कारण माझी मुलं लहान होती आणि मला त्यांच्याकडे लक्ष द्यायचं होतं. मला आशा होती की त्या चित्रपटाच्या नंतर मी काम करत राहीन, पण काही वर्षे हे शक्य झाले नाही.”
पूर्वीपेक्षा सुंदर आणि ग्लॅमरस रूपात परतणार मधू
मधु आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन तिचे लेटेस्ट फोटोज नेहमी शेअर करत असते, त्यात ती पूर्वीपेक्षा अधिक सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. मधुने याआधी हिंदी की पहचान, घोषणापत्र, प्रेमरोग, जालिम, दिलजले, उडान, जनता की अदालत अशा अनेक चित्रपटात काम केले आहे.
हिंदीसोबतच कन्नड, तामिळ, मल्याळम आणि तेलगू चित्रपटांमध्येही तिने काम केले आहे. टीव्ही मालिकांमध्येही मधुने काम केले आहे. मनोज शर्मा दिग्दर्शित “खली बली” चित्रपटातून मधू परत येत आहे. चित्रपटाचे शूटिंग मुंबईत होणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.