भाडेतरु त्या लोकांना म्हणले जाते जे लोक विशिष्ट निर्धारीत भाडे देऊन दुसऱ्या व्यक्तीच्या मालकीच्या घरात ठराविक काळासाठी वास्तव्य करतात. साधारणपणे भारतातील घरमालक आपल्या भाडेकरूंसोबत चांगले वागताना दिसत नाहीत, अशी एक तक्रार ऐकायला मिळते. या घरमालकांच्या सततच्या मनमानी वागण्यामुळे आणि अवाजवी भाड्याच्या मागणीमुळे भाडेकरू लोकांचे शोषण होते.
भाडेकरूंना आपले कायदेशीर हक्क माहित नसल्याने ते सुद्धा जास्त काही न बोलता घडणाऱ्या गोष्टी सहन करत असतात. काही ठराविक प्रमुख नियम सोडले तर भारतातील प्रत्येक राज्यात भाडेकरुंसाठी वेगवेगळे नियम बनवण्यात आले आहेत. त्या नियमानुसार भाडेकरुंना कायदेशीर संरक्षण मिळते. पाहूया भाडेकरूंना नेमके कोणकोणते कायदेशीर हक्क आहेत…
१) खाजगीपणाचा अधिकार :
भाडेकरुला घर भाड्याने घेतल्यानंतर खाजगीपणाचा अधिकार मिळतो. म्हणजेच भाडेकरुच्या पूर्व परवानगी शिवाय घरमालक कोणत्याही टप्प्यावर भाडेकरुच्या मालमत्तेत प्रवेश करू शकत नाही. या भाड्याच्या अवधीदरम्यान भाडेकरुला आपला खाजगीपणा अबाधित ठेवण्याचा अधिकार आहे.
२) मालमत्तेचा हक्क :
भाड्याच्या अवधीत भाडेकरुला भाड्याने घेतलेली मालमत्ता धारण करण्याचा अधिकार असतो. या दरम्यान आपल्या भाडेपट्टीला विक्री, परमालकी, वारसा किंवा मालमत्तेचा लिलाव या कुठल्याही माध्यमातून धक्का लावता येत नाही. म्हणजेच तुमच्या जमीनदाराने ती मालमत्ता बँकेकडे तारण ठेवली असेल तर जोपर्यंत भाडेकरुचा भाडेपट्टा वैध असेल तोपर्यंत बँक भाडेकरुच्या अधिकारांवर अतिक्रमण करू शकत नाही. भाडेकरूला कायदेशीररित्या भाड्याने घेतलेल्या मालमत्तेचा हक्क मिळतो.
३) नि:शुल्क वापराचा अधिकार :
भाडेकरारानुसार जरी आपण भेटायला येणाऱ्यांना घरात आणू शकत नसलो किंवा मांसाहारी अन्न शिजवू शकत नाही; तरी ते निरर्थक आहेत. रहिवासी म्हणून तुम्हाला जे काही करायचे असेल करण्याचा अधिकार आहे; आपल्या कुटुंबाला कितीही दिवस राहण्यासाठी घेऊन येऊ शकता, तुम्हाला हवे ते अन्न शिजवू शकता ! तुम्हाला घरात कुत्रा पाळायचा असेल तर पाळू शकता, पण त्या कुत्र्याने काही नुकसान केल्यास त्याविरोधात तक्रार आल्यास तुम्हाला तो कुत्रा घरात ठेवता येत नाही.
४) सीमेवरचा हक्क :
जर आपण भाड्याने घेतलेल्या मालमत्तेच्या एखादे झाड किना विहीर असेल, तर भाडेकरुला त्या झाडाच्या फळाचा किंवा विहिरीच्या पाण्याचा उपभोग घेण्याचा अधिकार आहे. करारामध्ये जे काही असेल त्याकडे दुर्लक्ष करून अशा वस्तूंचा वापर करण्यास घरमालकालाही तो नकार देऊ शकतो. भाडेकरू पुढील ६ किंवा १२ महिन्यांची आगाऊ रक्कम भारत नसेल, परंतु नियमित भाडेपट्टी जमा करत असेल तर भाडेकरूने भाडेकराराचे उल्लंघन केले असे मानता येत नाही.
५) इतर अधिकार :
भाडेकरूला घरमालकाची योग्य ती संपर्क माहिती मिळण्याचा हक्क आहे, भाडेकरू त्या घरमालकाला कोणत्याही वेळी संपर्क साधू शकतो. भाडेकरू भाड्याची रक्कम थेट घरमालकाच्या खात्यात जमा करू शकतो, जर घरमालक काहीही प्रतिसाद देण्यास असमर्थ असेल तर मनीऑर्डरने भाडे घरमालकाला पाठवता येते. भाडेकरूला घरमालकाची जबाबदारी असलेल्या कोणत्याही दुरुस्त्यांची परतफेड मिळवण्याचा हक्क आहे. भाडेकरार संपुष्टात येण्याआधी भाडेकरूला पुर्वनोटीस मिळण्याचा अधिकार आहे.
६) कायदेशीर वारसाचा हक्क :
भाडेकरूच्या कायदेशीर वारसालाही भाडेकरू मानता येईल. भाडे नियंत्रण कायद्यानुसार भाडेकरूस असणारे सर्व कायदेशीर संरक्षण मिळण्यास तो वारस पात्र असेल. भाडेकरूला भाडेकराराशी संबंधित नोंदणी पुस्तकातील कोणत्याही नोंदणीची पावती मिळण्याचा हक्क आहे.
घरमालकाला तुम्हाला नोटीसच्या कालावधीत भाडे भरण्यास सांगण्यास आणि ठेवीच्या विरूद्ध तोडगा काढण्याचा कोणताही कायदेशीर अधिकार नाही. भाडेकरूस वैध कारणास्तव परिसर रिकामा करण्याचा अधिकार आहे. भाडेकरूने आपला भाडेकरार कंटिन्यू करण्यास सांगण्याचा घरमालकाला अधिकार नाही.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.