आज रितेश देशमुखच्या ४१ वा वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव यांचा मुलगा असणाऱ्या रितेशने बॉलिवूड इंडस्ट्रीत स्वतःच्या अभिनयाची वेगळी छाप निर्माण करुन प्रेक्षकांची माने जिंकली आहेत. रितेश आणि जेनेलिया डिसुझा यांनी २०१२ मध्ये लग्न केले आणि जेनेलिया देशमुखांची सून म्हणून महाराष्ट्रात आली. लग्नानंतर त्यांना एक मुलगा झाला त्याचे नाव त्यांनी रियान ठेवले. पण तुम्हाला माहित आहे का त्यांनी मुलाचे नाव रियन का ठेवले. चला तर जाणून घेऊया…
रितेश देशमुखने काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात आपल्या मुलाचे नाव रियान का ठेवले याबाबतचा एका मजेशीर किस्सा सांगितलं होता. रितेश आणि जेनेलियाला आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे याची उत्सुकता लागून राहिली होती. रितेश देशमुख शुटींगसाठी पोलंडमध्ये गेलेला असताना देखील रितेशच्या मनात आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे हाच विचार चालू होता. संध्याकाळच्या वेळी हॉटेलच्या प्रांगणात पाय मोकळे करत असताना चाणाक्ष रितेशला एक नाव सुचले.
रितेशने तात्काळ जेनेलियाला फोन केला आणि आपल्या मुलाचे नाव आपण “रियान” असे ठेवायचे का असा प्रश्न विचारला. त्यावर जेनेलियाने विचारले की याचा अर्थ काय होतो ? पण त्यावेळी रितेशला देखील रियान शब्दाचा अर्थ माहित नव्हता. त्यानंतर रितेशने गुगलवर रियान शब्दाचा अर्थ शोधला. तिथे त्याला त्याचा अर्थ सापडला. रियान हा संस्कृत शब्द असून जवळपास त्याचा वापर सर्वच भाषांमध्ये केला जातो. रियानचा अर्थ आहे राज्य करणारा किंवा छोटा राजा रितेशच्या घरी जन्म घेणे त्या बाळासाठी राजापेक्षा कमी नाहीच ना…
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.