स्वातंत्र्य चळवळीत आणि स्वातंत्र्यानंतरच्या राजकीय, सहकार, शेतकरी, कामगार, इत्यादि चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रातील काही राजकीय घराणी उदयाला आली. महाराष्ट्रात जरी २८८ विधानसभा मतदारसंघ असले तरी राजकीयदृष्टया या ठराविक कुटुंबांच्या अवतीभोवतीच महाराष्ट्राचे राजकारण फिरत राहिले.
त्यातूनच त्यांच्यात नातेसंबंधही निर्माण झाले. त्यामध्ये केवळ घराणेशाहीचा विषय नसतो, तर त्या कुटुंबाच्या राजकीय योगदानाचाही तितकाच मोठा प्रभाव असतो. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर कोण कोण नातेवाईक विधानसभेत जाणार त्याचा हा घेतलेला आढावा…
राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार आणि यांचे पुतणे रोहित पवार एकाचवेळी विधानसभेत जाणार आहेत. तसेच अजित पवारांच्या मेव्हण्यांचे पुत्र राणाजगजितसिंह पाटील हेदेखील भाजपकडून विधानसभेत जाणार आहेत. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुखांची धीरज देशमुख आणि अमित देशमुख हे दोन्ही सख्खे भाऊ काँग्रेसकडून विधानसभेत जाणार आहेत. काँग्रेसच्या विश्वजित कदमांसोबत त्यांचा मावसभाऊ विक्रम सावंत आणि भगिनींचे दीर संजय जगताप हे देखील आता विधानसभेत जाणार आहेत.
इस्लामपूरमधून राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटलांसोबत त्यांचा भाचा प्राजक्त तानपुरे हा देखील राहुरीमधून विधानसभेत जाणार आहे. संगमनेरच्या काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरातांसोबत त्यांच्या भाच्याची पत्नी मोनिका राजळे आणि भाचीचे पती शंकरराव गडाख हे देखील विधानसभेत जाणारे आहेत.
थोरातांचे मेव्हणे सुधीर तांबे विधानपरिषदेत आहेत. माढामधून राष्ट्रवादीचे बबनदादा आणि करमाळ्यामधून संजयमामा हे दोघे शिंदे बंधू विधानसभेत जाणार आहेत. त्यासोबत बबनदादांचे जावईबापू संग्राम थोपटे देखील भोरमधून विधानसभेत जाणार आहेत.
श्रीगोंद्यातून बबनराव पाचपुते आणि त्यांच्या मुलाचे सासरे शिराळ्यातील मानसिंगराव नाईक हे व्याही विधानसभेत जाणार आहेत. वसईमधील हितेंद्र ठाकूर आणि नालासोपाऱ्यातील क्षितिज ठाकूर हे बापलेकसुद्धा विधानसभेत जाणार आहेत. राष्ट्रवादीचे रामराजे निंबाळकर विधानसभेत तर त्यांचे जावी राहूल नार्वेकर विधानपरिषदेत बघायला मिळतील.
याउलट शिवसेनेचे रामदास कदम विधानपरिषदेत तर त्यांचा मुलगा योगेश कदम विधानसभेत बघायला मिळणार आहे. काँग्रेसच्या विधानपरिषदेतील सतेज पाटलांचा पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभेत आला आहे. तर राष्ट्रवादीच्या विधानपरिषदेतील अरुणकाका जगतापांचा मुलगा विधानसभेत आला आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.