दिवाळीला घरी जाता आले नाही म्हणून Redbus केले सुरु…

Redbus हे ॲप आज-काल सर्वांच्या मोबाईल मध्ये आहे. या ॲपमुळे आपली बरीच धावपळ वाचवली आहे. घर बसल्या गाडीच्या तिकिटाचे बुकिंग आपण या द्वारे करतो. कुठेही लाईन मध्ये लागायची गरज नाही किंवा कोणालाही कमिशन देऊन तिकीट बुक करायची गरज नाही. हि सेवा सुरु होण्या मागची कथाही तशीच रंजक आहे. चला बघूया खासरे वर कशी सुरु झाली रेडबस सेवा…

हैदराबाद येथील रहिवासी फणिंद्र समा, चरण पद्माराजू आणि सुधाकर पासुपुनुरी या तिघांनीही बिट्स पिलानीमधून इंजिनिअरिंगची पदवी घेतली. आणि तिघेही बंगळुरूमधील एका मोठ्या एमएनसीजमध्ये कार्यरत होते. सर्व आयुष्य व्यवस्थित सुरु होते. अचानक दिवाळी सणानिमित्त फणिंद्र हा आपल्या घरी हैदराबादला जाण्यासाठी निघाला.

बंगरूळू व हैद्राबाद हे अंतर अगदी १२ तासाचे आहे. परंतु त्याला त्या दिवशी तिकीट मिळाले नाही तिकीटकरिता त्याने अनेक ट्रॅव्हल एजंट्स, ट्रॅव्हल कंपन्यांना विनंती केली. पण तिकीटाऐवजी त्याच्या पदरी घोर निराशाच पडली. दिवाळी सारखा सण व तो घरी जाऊ शकला नाही. तेव्हा त्याला अचानक कल्पना सुचली, आपण असा प्लॅटफॉर्म तयार करू, जेणेकरुन कोणीही, कोणत्याही क्षणी, कुठूनही तिकीट बूक करु शकतो. फणिंद्रने ही कल्पना चरण आणि सुधाकरसोबत शेअर केली. हे तिघेही आयटी क्षेत्राशी निगडीत होते यांना ती कल्पना सत्यात उतरवायला फार वेळ लागला नाही आणि रेडबस हे मोबाईल ॲप आपल्या सर्वाना मिळाले. अनेक लोकांची कष्ट या ॲप मुळे वाचली आहे.

ऑगस्ट 2006 साली रेडबस पूर्णपणे कार्यन्वित झाली. प्रथम तिकीट बूकिंग वेबसाईट आणि त्यानंतर अद्यावत ॲप असा प्लॅटफॉर्म रेडबसने प्रवाशांना दिले. आज रेडबसचे जाळे 15 राज्यात विस्तारले असून त्यांच्याकडे ७०० बस ऑपरेटर्स व १०,००० बस या सेवेमध्ये नोंदणीकृत आहेत. मागील वर्षी रेडबसनि ३०० करोड रुपयाची तिकीट विक्री केली आणि त्याची हि घौडदौड यशस्वी पण सध्याही सुरु आहे. त्याने हि कंपनी ibibo सोबत करार करून विकली व ६०० रुपये कमावले आहे.

आता कंपनीने काळानुरूप व्याप वाढविलेला आहे. हॉटेल बूकिंग सेवाही त्यांनी सुरू केली आहे. फणिंद्रच्या दिवाळीला घरी जाण्यासाठी तिकीट मिळाले असते तर आज हि सेवा आपल्याला मिळाली नसती. तिकीट न मिळाल्यामुळे त्याची घोर निराशा झाली. परंतु, आज त्याच्याच कल्पनेमुळे अनेक प्रवासी सुखाने प्रवास करीत आहेत.

कुठल्याही घटनेमागे एक संधी असते ती दवडायला नको हे फणींद्र आपल्याला सांगून जातो योग्य वेळेस योग्य कल्पना व संधी सुचल्यास ती दवडू नका…

पटल्यास नक्की शेअर करा…

तीनशे रुपये पगार घेणारा करोडपती पाटील

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.