भारतीय वायूदलानं पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्याची हि दृश्यं जाम भारी! पण काय आहे सत्यता..

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई सेनेने पाक व्याप्त काश्मिर मधील दहशतवादी तळावर हल्ले केले त्यानंतर सोशल मीडियावर सर्वांनी जल्लोष करणे सुरू केले आहे. प्रत्येक व्यक्तीला हल्ला कसा झाला याबद्दल उत्सुकता आहे. त्याचमुळे काही लोकांनी वेगवेगळ्या अफवा पसरवणे सुरू केले.भारताच्या हवाई दलानं जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ला केल्यानंतर सोशल मिडीयावर काही व्हिडीओ वायरल केले ज्यात असा दावा केला की हे व्हिडिओ भारतीय हवाई सेने ने हल्ला करताना शूट केले आहेत.

याच वेळी एक व्हिडिओ प्रचंड वायरल होत आहे ज्यात पाक व्याप्त काश्मीर मधील तळावर हल्ला केल्याचा दावा केला जातोय. हा व्हिडिओ अनेक मोठ्या पेजस वरून वायरल करण्यात आला आहे. आपण ही तो पाहू शकता. व्हिडिओ पाहिल्यास वाटते की खरंच असा दहशतवादी हल्ला केला असेल पण त्या व्हिडिओ च्या सत्यते विषयी शंका उपस्थित करण्यात आली आहे.

हवाई दलानं कशाप्रकारे हल्ला केला असेल हे दाखवणारा सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला जो व्हीडिओ आहे तो प्रत्यक्षात आर्मी-2 या व्हीडिओ गेमचा असल्याचं समोर आलं आहे. या व्हिडीओ ची सत्यता प्रसिद्ध न्यूज पोर्टल आल्ट न्यूज ने तपासली आहे.

आल्ट न्यूज च्या पत्रकार पूजा चौधरी यांनी व्हिडीओ बाबत ची सत्यता तपासून पाहून हा व्हिडीओ आर्मी 2 या व्हिडीओ गेम चा आहे हे सिद्ध केला. काही लोकांनी जाणून बुजून हा व्हिडीओ वायरल करून सामान्य माणसाच्या भावनेशी खेळायचा प्रयत्न केला.

व्हायरल झालेला व्हिडीओ-

कोणतीही गोष्ट सोशल मीडियावर व्हायरल करत असाल तर तिच्या सत्यतेबाबत जागरूक रहा.माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.