सासूच्या विरहात सुनेने आत्महत्या केलेल्या घटनेचे धक्कादायक वास्तव आले समोर..

काही दिवसापूर्वी सर्वाधिक वाचल्या गेलेली बातमी जिच्याकडे सासू सुनेचे असणारे प्रेमळ नाते म्हणून पाहिल्या जात होते. त्याबाबत एक वास्तव माहिती समोर आली आहे. आपण वाचले असेलच कि कोल्हापूर येथील आपटेनगर परिसरात राहणारे लोखंडे परिवारातील मालती लोखंडे यांचे शनिवारी पहाटे निधन झाले. या निधनाच्या धक्‍क्‍याने सुन शुभांगी लोखंडे अस्वस्थ झाली.

देवघरातून त्यांनी आंगारा आणला. त्यानंतर तो आंगारा सासुला लावला पण त्यानंतर प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सासुच्या निधनाचा धक्का सहन न झाल्याने शुभांगी लोखंडे यांनी दुसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली.

हि जी स्टोरी आपण वाचली ती वाचून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. पण हि स्टोरी रचलेली होती असे पोलीस तपासात उघड झाले आहे. शुभांगी लोखंडे हिने आपली सासू मृत्यू पावल्यावर जी काही प्रतिक्रिया दिली त्यावर चिडून पती संदीप लोखंडे याने दुसऱ्या मजल्यावरून फेकून दिले. खाली पडल्यानंतर जखमी पत्नीच्या डोक्यात फरशी घातली. त्यानंतर संदीप लोखंडे याने आपल्या आईच्या मृत्यूचा धक्का बसून पत्नीने आत्महत्या केल्याचा बनाव रचला.

हा बनाव जुना राजवाडा पोलिसांनी लगेच ओळखला आणि १० वी ची परीक्षा देऊन आलेल्या त्यांच्या मुलाकडे चौकशी केल्यावर संदीप लोखंडे यांनी सर्व खोटा बनाव रचला आहे हे पोलिसांना लक्षात आले. पती लोखंडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केल्यांनतर त्याने खून केल्याची कबुली दिली.

कोल्हापूर शहर पोलिस अधिक्षक प्रेरणा कट्टे व नुतन पोलिस निरीक्षक प्रमोद जाधव यांनी या घटनेचा यशस्वी तपास केला आहे. आपल्या सर्वानी सासू सुनेच्या प्रेमाचे उदाहरण म्हणून या घटनेला शेअर केले होते पण हि घटना पूर्ण वेगळी आहे हे समोर आले.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

हे हि वाचा- आचारसंहिता लागू झाल्यानंतर होत नाहीत ही कामे…
हे हि वाचा- २०१४ च्या मोदींच्या विजयात महत्वाची भूमिका असलेल्या प्रशांत किशोर यांनी का सोडली मोदींची साथ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.