निवडणुकीच्या आधी आयाराम गायारामानी हि निवडणूक गाजवली परंतु हे चक्र काही थांबायचे नाव नाही घेत आहे. कॉंग्रेस एनसीपी चा पठिंबा घेऊन लढलेले काही आमदार आता युतीच्या मार्गावर जाताना दिसत आहे.
बडनेरा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना रवि राणा यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा मिळवला होता. काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील अनेक इच्छुकांना डावलून रवि राणांना पाठिंबा देण्याचे वरिष्ठ पातळीवरील राजकारण अनेक स्थानिक नेत्यांना पसंत पडले नाही. तरी, काही काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते प्रचारादरम्यान रवि राणा यांच्यासोबत होते. अनेकांनी मात्र त्यांच्यापासून दूर राहणेच पसंत केले होते.
हायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ अमरावतीत आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझ्याविरुद्ध शब्दही उच्चारला नाही. त्यामुळे त्यांनी न बोलताच मला पाठिंबा दिला, असा दावा करीत मुख्यमंत्री हे माझे चांगले मित्र असून, ते माझ्यासोबतच आहेत, असे वक्तव्य बडनेऱ्याचे अपक्ष आमदार रवि राणा यांनी केले होते आणि त्याची परतफेड त्यांनी केलेली दिसत आहे.
युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष व बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवि राणा यांनी भाजपला बिनशर्त पाठिंबा दिल्याने काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते अचंबित झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा पाठिंबा घेऊन रिंगणात उतरलेल्या राणांची ही कोलांटउडी राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.
राणा यांच्या पत्नी नवनीत राणा या अमरावतीच्या खासदार आहेत. त्या देखील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या पाठिंब्यावर निवडून आल्या होत्या. पण जिंकल्यानंतर लगेच नवनीत राणा आणि रवि राणा यांनी भाजपच्या सत्तावर्तुळात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
महाराष्ट्र राज्यातील सर्व प्रमुख प्रश्नांसोबत शेतकरी,शेतमजूर ,कामगार,इतर सामान्य नागरिकांचे प्रश्न हे मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस चांगल्या प्रकारे सोडूच शकतात या सोबतच मागील पाच वर्ष मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळला व जनतेला न्याय दिला अमरावती जिल्ह्याच्या विकासासाठी व बडनेरा मतदार संघाच्या विकासासाठी आपणच पुन्हा एकदा मुख्यमंत्री व्हावेत या करीता आपणास पाठिंबा देत आहोत,’ असे पत्र रवी राणा यांनी दिले आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@Khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.