देशातील सर्वात मोठा उद्योगपती रतन टाटा यांच्या सोबत काम करण्याचे स्वप्न प्रत्येक जण बघत असेल. परंतु काहीच लोक नशीबवान असतात ज्यांना हि संधी मिळते. परंतु एक मुलगा असाही आहे ज्याला स्वतः रतन टाटा यांनी फोन करून विचारले कि “माझा असिस्टन्ट होणार का ?”
हा युवक शंतनू नायडू आहे. मुंबई येथे राहणारा २७ वर्षीय शंतनू नायडू हा युवक तोच आहे ज्याला रतन टाटा याने यांनी स्वतः फोन केला आहे. काही वर्षा अगोदर शंतनू हा रस्त्यावरील भटक्या कुत्र्यासाठी काम करत होता. आज तो जगात प्रसिद्ध असलेले उद्योगपती रतन टाटा यांच्या अतंत्य जवळचे आहे.
शंतनू यांनी सांगितलेल्या एका मुलाखतीत तो सांगतो कि, ” माझी मुलाखत रतन टाटा यांच्यासोबत ५ वर्षा अगोदर झाली होती. ५ वर्षा अगोदर रस्त्यावरील कुत्र्याचे हाल बघून मला वाईट वाटत होते. कुत्र्यांना अपघातापासून वाचविण्यासाठी मी त्यांच्या गळ्यात रिफ़्लेक्टर असलेली कॉलर लावण्यास सुरवात केली. यामुळे कुत्र्याच्या अपघाताट घट झाली त्यांचा जीव वाचू लागला. टाटा कंपनीचे ‘न्यूज लेटर’ गोष्ट छापण्यात आली होती.”
एका पत्राने शंतनू याचे आयुष्य बदलले, रतन टाटा यांना त्याने पत्र लिहिले त्याला २ महिन्याने उत्तर आले आणि रतन टाटा याने स्वतः त्याला भेटायला बोलविले. रतन टाटाना शंतनूचे काम आवडले आणि त्यांनी शंतनूला मदत देण्याचे आश्वासने दिले. रतन टाटा यांनी शंतनूला आपल्या घरी नेले आणि त्याची कुत्री दाखविली.
या नंतर शंतनू विदेशात आपले शिक्षण घेण्यासाठी गेला शिक्षण पूर्ण झाल्यावर तो भारतात आला आणि रतन टाटा यांनी स्वतः शंतनूला फोन केला आणि म्हटले ” मला ऑफिसमध्ये बरेच काम आहे, माझा असिस्टन्ट होणार का ?” आणि शंतनू याने कुठलाही विचार न करता रतन टाटा यांना हो म्हटले.
शंतनू मागील १८ महिन्यापासून रतन टाटा यांच्या सोबत टाटा ट्रस्ट करिता काम करतो. शंतनू यांनी रतन टाटा यांच्या खांद्यावर हात ठेवून नुकताच एक फोटो शेअर केला आहे आणि हा फोटो प्रचंड व्हायरल होत आहे. लोकामध्ये या फोटो मुळे उस्तुकता वाढली होती आणि आता या उस्तुकतेचे आणि आम्ही संधान केलेच असेल.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आपल्या कडील खासरे माहिती तुम्ही आम्हाला info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवू शकता.