उद्धव ठाकरे यांची सासरवाडी आहे हे छोटेसे गाव, मध्यमवर्गीय कुटुंबात झाला रश्मीताईंचा जन्म ..

उध्दव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यामुळे त्यांच्या नावासोबत सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव हे रश्मी ठाकरे आहे. बाळासाहेबानंतर उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची धुरा यशस्वीपणे संभाळली व बाळासाहेबांचे स्वप्न त्यांनी पूर्ण करून दाखविले. या सर्व प्रवासात त्यांना साथ लाभली त्यांची अर्धागिनी रश्मी ठाकरे यांची, सोज्वळ स्वभाव आणि हसतमुख चेहरा हा महाराष्ट्राला नेहमी त्यांचा दिसतो. अनेकदा त्यांनी घरासोबत राजकारणातहि आपला दबदबा दाखविला आहे. रश्मीताईचा जन्म हा मूळ कोकणातील एका खेडेगावातील आहे.

१३ डिसेंबर १९८८ रोजी उद्धव ठाकरे आणि रश्मी ताई ठाकरे यांचे लग्न झाले. कोकणातील देवगड तालुक्यातील दाभोळे हे रश्मीताईंचे मूळ गाव आहे. या गावासोबत आजही त्यांची नाळ जुळून आहे कारण आजही या गावात त्यांचे काका आणि चुलत भाऊ राहतात आणि आजही ते सामान्य आयुष्य जगतात. पुढे त्‍यांचे आई वडील मुंबईत कामानिमित्त स्‍थायिक झाले.

मधुकर पाटणकर, श्यामराव पाटणकर हे रश्मी ताई यांचे काका आजही याच गावात राहतात. 2010 मध्ये कल्याण-डोंबीवली येथील महापालिकेच्या निवडणूक प्रचारातही रश्मी ठाकरेंनी प्रचाराची धुरा संभाळली होती. त्यावेळेस रश्मी विरुद्ध शर्मिला असा हा राजकारणाचा खेळ रंगला होता. रश्मी आणि उद्धव ठाकरे यांना आदित्य आणि तेजस हे दोन मुले आहेत. शिवसेना महिला आघाडीची धुरा सांभाळण्याचा अनुभव असलेल्या रश्मी ठाकरे यांना आहे. तसेच अनेक सेलिब्रिटी आणि उद्योगपती यांच्या सोबत त्या सहज मिसळतात. रश्मी ठाकरेंना गझल गायनाचीही आवड आहे.

जयवंती यांनी उद्धव ठाकरेंचं रश्मी ठाकरे (तेव्हाच्या पाटकर) यांच्याशी लग्न व्हावं म्हणून पुढाकार घेतला होता. रश्मी पाटकर आणि जयवंती ठाकरे या मैत्रिणी होत्या. “जयवंती यांनी सुचवलं होतं की ही मुलगी ‘दादू’ साठी साजेशी ठरेल,” धवल सांगतात. राज ठाकरेंच्या बहिणीने जमवलं उद्धव ठाकरेंचं लग्न.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.