रणवीर-दीपिका एका वेळच्या जेवणासाठी किती खर्च करतात माहिती आहे का?

सध्या सोशल मीडियावर दीपिका पदुकोणचा बालपणीचा फोटो चांगलाच व्हायरल झाला आहे. दीपिका आज बॉलिवूडची सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. फोटोत ओळखू न येणारी दीपिका आज बॉलिवूडवर अधिराज्य गाजवत आहे.

सध्या दीपिका ‘छपाक’ आणि ‘८३’ या चित्रपटात बिझी आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित ‘छपाक’हा सिनेमा एका सत्य घटनेवर आधरित आहे. लक्ष्मी अग्रवाल या अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेच्या आयुष्यावर बेतलेल्या या सिनेमात दीपिका लक्ष्मीची भूमिका साकारताना दिसणार आहे.

दीपिका आणि निमार्ता मधू मंटेना मिळून लवकरच महाभारतावर आधारित चित्रपट मालिकांची निर्मिती करत आहेत. यात दीपिका द्रौपदीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, द्रौपदीला केंद्रस्थानी ठेवून या चित्रपटांची कथा लिहिली जाणार आहे. याच एका अटीवर दीपिकाने द्रौपदीचे पात्र साकारण्यास होकार दिला आहे.

ओम शांती ओम या चित्रपटातून दीपिकाने बॉलिवूड डेब्यू केला. यानंतर बचना ऐ हसीनो, ये जवानी है दीवानी, चेन्नई एक्सप्रेस, हॅपी न्यू ईअर, गोलियों की रासलीला-रामलीला, पिकू, तमाश, बाजीराव मस्तानी, पद्मावत अशा अनेक चित्रपटांत ती दिसली. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी अभिनेता रणवीर सिंगसोबत ती लग्नबेडीत अडकली.

रणवीर आणि दीपिका हे एक स्टायलिश कपल म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखले जाते. दोघांची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावते. रणवीर सिंगने अनेक सुपरहिट सिनेमे बॉलीवूडला दिले तर दीपिका देखील एक यशस्वी अभिनेत्री बनली आहे.

जेवणावर देतात विशेष लक्ष-

सर्वच बॉलिवूड सेलेब्रिटी आपल्या व्यस्त जीवनशैली मधून आपल्या आरोग्यासाठी वेळ देत असतात. स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी व्यायाम करणे असेल किंवा योगा आणि आहाराकडे ते विशेष लक्ष देतात. दीपिका आणि रणवीर देखील आपल्या जेवणावर विशेष लक्ष देतात. आपल्या चांगल्या आहारासाठी ते लाखो रुपये खर्च करतात.

दीपिका रोज दिवसातून सहा वेळा थोड्या थोड्या प्रमाणात जेवण करते. या जेवणामध्ये कायम पौष्टीक पदार्थाचा समावेश असतो. सकाळी कोमट पाण्यामध्ये मध आणि लिंबाचा रस मिक्स करून पाणी पिते. तर नाश्त्यामध्ये दोन उकडलेली अंडी, बदाम, एक ग्लास लो फॅट मिल्क, 2 इडली किंवा 2 प्लेन डोसा,उपमा हे पादर्थ ती खाते.

हे दोघे जेव्हा शूटिंगमध्ये बिझी असतात. तेव्हा ते ऑनलाईन फुड ऑर्डर करतात. मात्र फुड ऑर्डर करताना हे फक्त एकाच ठिकणाहून ऑर्डर करतात. ते ठिकाण आहे पॉड सप्लाय. हि कंपनी खासकरून सेलिब्रिटींना डायट फूड पुरवते. या कंपनीकडून रणवीर दीपिकाच नाही तर अक्षय कुमार, अनिल कपूर हे देखील जेवण ऑर्डर करतात. या जेवणासाठी हि कंपनी लाखो रुपये घेते. पॉड सप्लाय कंपनी दिवसातून ४-६ वेळा टिफिन साठी रोज २५हजारापासून पुढे पैसे घेते. म्हणजेच त्यांच्या जेवणाचा महिन्याचा खर्च जवळपास १० लाखांच्या घरात आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.