आपल्या टॅलेंटच्या जोरावर मातीपासून मेघापर्यंत प्रवास करणारी रानू मोंडल सध्या चर्चेत आहे. रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणून कसाबसा स्वतःचा चरितार्थ चालवणाऱ्या रानूचा गाणे म्हणतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर रानू रातोरात बॉलिवूड मायानगरीत जाऊन पोहोचली.
रानूच्या आवाजात इतकी जादू होती की, तिचा आवाज ऐकून लोक स्तब्धपणे उभे राहायचे आणि तिची गाणी ऐकायचे. सोशल मिडीयावर लता मंगेशकरांच्या आवाजात गाणे गाणारी महिला म्हणून फेमस झालेल्या रानूने आता स्टुडिओमध्ये हिमेश रेशमियासोबत स्वतःचे पहिले गाणे रेकॉर्ड केले आहे.
रानूने सांगितली स्वतःची कहाणी
नुकतेच रानू मोंडलला सोनी टीव्हीवरील “सुपरस्टार सिंगर” नावाच्या एका रियालिटी शोमध्ये प्रमुख पाहुण्या म्हणून निमंत्रित केले होते. त्या शोचे होस्ट जय भानुशाली यांनी रानूला विचारले की, “तुम्ही रेल्वे स्टेशनवर अशा पद्धतीने गाणी का म्हणता ?” यावर रानूने हसत हसत सांगितले, “माझ्याजवळ राहायला घर नव्हते आणि गाणी म्हणून पॉट भारत येत असल्यामुळे मी रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणायची. तिथे कोणी बिस्कीट द्यायचे तर कोणी पैसे !”
गाण्यामुळे रानूला अनेक गोष्टी मिळाल्या
रेल्वे स्टेशनवर गाणी म्हणण्याच्या बदल्यात रानूला केवळ बिस्कीट आणि पैसेच मिळाले नाहीत. तिचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आणि ती रातोरात स्टार झाली. त्या व्हिडीओमुळे १० वर्षानंतर तिला तिची मुलगी परत भेटली.
एवढेच नाही, हिमेश रेशमियाचा “हॅप्पी हार्डी अँड हिर” नावाचा चित्रपट येत आहे, त्यात रानूला “‘तेरी मेरी कहाणी” हे गाणे गाण्याचीही संधी दिली आहे. नुकतेच स्टुडिओमध्ये ते गाणे रेकॉर्ड केल्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.