बॉलीवूडच्या अभिनेत्रींचे अफेअर आणि ब्रेकअपच्या बातम्या नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. या गोष्टी बॉलिवूडसाठी नवीन नाहीयेत. या गोष्टींची चर्चा लोकांना करायला आवडते. सध्या अशीच एका अभिनेत्रीच्या अफेअरची चर्चा बॉलिवूडमध्ये मोठ्या प्रमाणावर होत आहे.
अजय देवगण तब्बूसोबत ‘दे दे प्यार दे’ या चित्रपटात झळकलेली साऊथची आघाडीची अभिनेत्री रकुलप्रीत सिंग सध्या तिच्या अफेअरमुळे चर्चेत आली आहे. अजय देवगणची हिरोईन म्हणून काम केलेल्या रकुलचे कोणासोबत अफेअर आहे याची तुम्हाला पण उत्सुकता लागली असेल. रकुल हि थेट ‘बाहुबली’च्या एका अभिनेत्याला डेट करत असल्याची चर्चा आहे.
रकुलचे ‘राणा’सोबत अफेयर?
रकुल हि थेट ‘बाहुबली’चा भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबाती याला डेट करत आहे. या दोघांनी मात्र यावर खुलासा केलेला नाहीये. मागील अनेक दिवसांपासून दोघांच्या अफेअरची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे. रकुलने सोफी चौधरीच्या चॅट शोमध्ये नुकताच सहभाग घेतला होता.
या शोमध्ये तिने राणा हा माझा केवळ चांगला मित्र असल्याचे म्हंटले आहे. मी फिल्मी करिअर सुरु करण्यापासून तो माझा मित्र आहे. तो माझा शेजारी आहे. शिवाय माझी बेस्ट फ्रेन्ड लक्ष्मी मांचू हिचाही मित्र आहे, असे रकुल म्हणाली.
दरम्यान रकुलने अफेअर बद्दल मान्य केले नसले तरी दोघांमध्ये काही तरी शिजतंय हे मात्र नक्की. रकुल गेल्या अनेक वर्षांपासून दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करत आहे. ती साऊथची एक आघाडीची अभिनेत्री आहे तर राणा देखील साऊथचा सुप्रसिद्ध अभिनेता आहे. रकुल ही तेलुगू, तामिळ, हिंदी व कन्नड या भाषांमधील चित्रपटांमध्ये काम करते. २०१४ मध्ये तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. ‘यारियाँ’ या चित्रपटात तिने मुख्य भूमिका साकारली होती.
कोण आहे राणा दग्गुबाती-
एस.एस.राजामौली दिग्दर्शित ‘बाहुबली’ या चित्रपटात भल्लालदेवाची भूमिका राणाने साकारली होती. बाहुबली हा चित्रपट प्रदर्शित होऊन तीन वर्ष उलटली असली तरी त्यातील कलाकारांची प्रसिद्धी जराही कमी झालेली नाही. भल्लालदेवची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती.
बाहुबली’ चित्रपटात भल्लालदेव जरी देवसेनेच्या प्रेमात असला तरी खऱ्या आयुष्यात राणाची ‘देवसेना’ हि रकुल असल्याची चर्चा आहे. माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.