राज ठाकरे यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी…

राज ठाकरे’ हे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात नेहमीच चर्चेत राहणारे नाव आहे. राज ठाकरे आजपासून फेसबुकवर त्यांच्या पेज मार्फत लोका सोबत सम्पर्कात राहणार त्यामुळे हे नाव सोशल मिडियामध्ये परत एकदा चर्चेत आले आहे. महाराष्ट्रात तर राज ठाकरे यांचा मोठा चाहता वर्ग आहे. राजकारणात येण्याअगोदर राज ठाकरेंना महाविद्यालयीन काळात त्यांनी ठरविले होते कि व्यंगचित्रकार व्हायचे. परंतु लहानपणापासून बाळासाहेब ठाकरे त्यांच्या काकासोबत राहून त्यांना राजकारणाचा बाळकडू मिळाला होता त्यामुळे ते यापासून दूर जाऊ शकले नाही. भारतीय विद्यार्थी सेना, शिव उद्योग सेना, शिवसेना आणि शिवसेनेतून बाहेर पडून ‘महाराष्‍ट्र नवनिर्माण सेना’ या पक्षाची स्थापना असा राज यांचा प्रवास आहे. परंतु राजकीय जीवनापलीकडे राज ठाकरे कसे आहेत हे बऱ्याच लोकांना माहिती नाही आहे. असेच त्यांच्या खासगी जीवनातील काही खासरे गोष्टी आपण आज त्यांच्या फेसबुकपेज वर येण्यानिमित्त खासरेवर जाणून घेणार आहोत.

राज ठाकरे यांचा जन्म १४ जून १९६८ रोजी झाला. मुळात त्यांचे नाव राज नसून स्वराज ठाकरे ठेवण्यात आले होते. हि गोष्ट अनेक लोकांना माहिती नाही आहे. परंतु कालांतराने त्यांना सर्व लोक राज म्हणून ओळखू लागले.

राज ठाकरे यांच्या वडिलाचे नाव श्रीकांत ठाकरे ते शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धाकटे बंधू होते. प्रसिद्ध संगीतकार म्हणून श्रीकांत ठाकरे सर्वच्या परिचयाचे होते. किडनीच्या आजाराने त्यांचे निधन १० डिसेम्बर २००३ मध्ये झाले. सामना आणि मार्मिक करिता त्यांचे अमुल्य योगदान होते.

राज ठाकरे यांचे वडील संगीतकार होते परंतु त्यांना आवड हि संगीत क्षेत्रात नसून व्यंगचित्र क्षेत्रात निर्माण झाली कारण काका बाळासाहेब ठाकरे हे आहे.

राज ठाकरे यांची आई कुंदा आणि उद्धव ठाकरे यांच्या आई म्हणजेच बाळासाहेबांच्या पत्नी स्वर्गीय मीना ठाकरे ह्या दोघी बहिणी आहेत.

राज ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण दादर मधील बालमोहन विद्यालयात पूर्ण झाले. त्यांचे संपूर्ण बालपण दादर येथेच गेले.

चित्रकलेची आवड आणि त्यांना चित्रकलेत करीयर करायचे असल्यामुळे त्यांनी पुढील शिक्षण चित्रकलेत सर जे जे स्कूल ऑफ आर्ट येथे पूर्ण केले.

राज ठाकरे यांना विचारले असता कि ” राजकारणात आले नसते तर काय केले असते ?” तर ते नेहमी सांगतात कि वाल्ट डीस्निच्या स्टुडीओ मध्ये मी चित्र काढत नक्की राहिलो असतो. कारण ते त्यांचे प्रेरणास्थान आहे. त्यांना कार्टूनची आवड बालपणापासून होती.

बालासाहेबाच्या आयुष्यावर स्वतः साहेब हयातीत असताना त्यांनी एक फोटोबायोग्राफी केली आहे त्याचे नाव “बाळ केशव ठाकरे” असे आहे. बाळासाहेबांनी सुध्दा या पुस्तकाची तोंड भरून स्तुती केली होती. त्या सम्बन्धित विडीओ आपण पाहू शकता.

राजकारणा व्यतिरिक्त राज ठाकरे “मातोश्री” नावाने बांधकाम कंपनी सुध्दा चालवितात.

चित्रपट निर्मिती आणि फोटोग्राफी यामध्ये सुध्दा राज ठाकरे यांना आवड आहे.

बाळासाहेब राजकीय दौऱ्यावर जात असताना बालपणापासून राज यांना सोबत नेत असे म्हणून लहान वयातच त्यांच्यात राजकारणाचे गुण आले. बाळासाहेब हेच त्यांचे राजकीय गुरु व सर्वस्व आहे.

राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे ह्या प्रसिद्ध नाटककार, दिग्दर्शक, निर्माते मोहन वाघ यांच्या कन्या आहे.

राज व शर्मिला ठाकरे यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव अमित ठाकरे आणि मुलीचे नाव उर्वशी हे आहते. उर्वशी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. जुडवा-२ हा उर्वशीचा पहिला चित्रपट असेल. तर अमित हा राज साहेबा सोबत राजकारणात सक्रीय असतो. तो आजारी होता परंतु मिडीयाने त्याला फुफुसाचा कॅन्सर आहे अश्या अफवा पसरविल्या होत्या याचे खंडन त्यांनी मागेच केले.

उद्योग,क्रिकेट, बॉलीवूडमध्येही राज ठाकरे यांचे चांगले संबध आहे. ते अनेक वेळेस अभिनेत्यांसोबत दिसतात त्यांच्या भेटीगाठी सुरु असतात. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनाहि त्याकरिता काम करत असते.

राज ठाकरे यांचे वडील संगीतकार असल्याने त्यांना तबला,गीतार,वायोलिन सारखी अनेक वाद्येही चांगल्या प्रकारे वाजविता येतात.

१९९७ मध्ये राज ठाकरे यांनी राजकारणात सक्रीय सहभाग शिव सेना उद्योग सेना स्थापन करून राजकारणात पदार्पण केले. १९९६ साली मायकल जैक्सन व लता मंगेशकर यांच्या कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन राज ठाकरे यांच्या कडे होते.

अमित व आदित्य ठाकरे

आपल्याला हि खासरे माहिती आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका… आणि आमचे पेज लाईक करा..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.