शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाºया कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २,१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या कथित गैरव्यवहारप्रकरणी कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेले तीन दिवस चौकशी झाली.
त्यानंतर त्यांचे भागीदार असलेले मातोश्री कन्स्ट्रक्शनचे राज ठाकरे यांची काल ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांचीही तब्बल २४ तास चौकशी झाली. तर राजन शिरोडकर यांची १३ तास ईडीने चौकशी केली. २६ ऑगस्टला त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.
राज यांच्या चौकशीत त्यांनी काही प्रश्नांची उत्तरे देताना त्यासंबंधी माहिती नसल्याचे सांगितले. कागदपत्रे पडताळून तपशील देण्याची हमी दिली. राज यांची रात्री ९ वाजेपर्यंत चौकशी सुरू होती. मात्र चौकशी पूर्ण न झाल्याने त्यांना पुन्हा कागदपत्रांसह पाचारण केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.
राज यांची तब्बल नऊ तास चौकशी झाल्यानंतर रात्री ९ वाजता जेव्हा आपल्या कृष्णकुंज निवासस्थानी पोहचले तेव्हा त्यांनी आपल्या शैलीत प्रतिक्रिया दिली नि म्हणाले,’कितीही चौकश्या केल्या तरी मी थोबाड बंद ठेवणार नाही’.
राज हे सकाळी चौकशीसाठी घरातून बाहेर पडले त्यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री, पत्नी, मुलगा, मुलगी, सून व बहीण देखील ईडीच्या कार्यालयापर्यंत आल्या होत्या. त्यांना गेटवर थांबवण्यात आले. त्यानंतर त्यांनी शेजारील ग्रँड हॉटेलमध्ये दिवसभर ठाण मांडले होते.
राज यांना विचारण्यात आले हे ८ प्रश्न-
१. मातोश्री कन्स्ट्रक्शनचे भागभांडवल, भागीदार कोण कोण आहेत?
२. कोहिनूर समूह ग्रूपमध्ये किती गुंतवणूक केली होती?
३. भागीदारीचा हिस्सा किती होता?
४. अन्य कोण कोण भागीदार होते, त्यांचा हिस्सा किती होता?
५. कंपनीतील भागीदारी सोडण्याचे कारण काय?
६. भागीदारीचे समभाग किती रकमेत विकले?
७. या व्यवहारात आर्थिक फायदा की नुकसान झाले?
८. कोहिनूर प्रकल्प तोट्यात जाण्याचे कारण काय?
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.