कोहिनूर मिल खरेदीप्रकरणी (Kohinoor Square) मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना ईडीने समन्स बजावलं आहे. राज ठाकरे सकाळी साडेदहा वाजता कृष्णकुंज या निवासस्थानावरुन ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. राज ठाकरे यांचा 9 नंबरचा आकडा लकी बोलला जातो.
राज ठाकरे लँड क्रूझर या त्यांच्या नऊ नंबरची गाडीत ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसले. त्यांच्या मागे इनोव्हा गाडी होती, ती सुद्धा नऊ नंबरची. त्यामध्ये राज यांचे सुपुत्र अमित ठाकरे ड्रायव्हरच्या बाजूच्या सीटवर बसले होते. तर त्याच गाडीत मागे अमित ठाकरे यांची पत्नी मिताली आणि आई शर्मिला ठाकरे बसल्या होत्या.
राज यांची चौकशी रात्री ८.१५ च्या सुमारास संपली आणि ते घरी देखील ९ वाजेच्या दरम्यानच पोहचले. हे सांगण्याचे कारण म्हणजे राज ठाकरे आणि ९ नंबरचं असणारं कनेक्शन. राज ठाकरेंचा ९ हा लकी नंबर आहे. त्यांचं या नंबरवरचं प्रेम वारंवार दिसून आलं आहे.
राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापणा करण्यासाठी जी तारीख निवडली होती ती देखील ९ मार्च २००६ होती. याशिवाय राज ठाकरेंच्या गाडीचा नंबरसुद्धा ९ आहे.
अमित ठाकरेंच्या लग्नात देखील राज यांनी ९ चं गणित जुळवून आणल्याची चर्चा होती. अमित यांच्या लग्नाच्या तारीख आणि वेळेची बेरीज करून देखील हे ९ चं गणित जुळलं होतं. अमित यांच्या लग्नाची तारीख हि २७ होती. यात २ आणि ७ ची बेरीज ९ होते. याशिवाय लग्नाचा वेळ १२ वाजून ५१ मिनिट होता. वेळेच्या ४ अंकाची बेरीज केली असता ती देखील १+२+५+१=९ होते.
राज यांच्या बाबतीत ९ आकड्याचा हा निव्वळ योगायोग असला तरी कार्यकर्त्यांना मात्र हे लकी नंबरचं कनेक्शन चांगलं पसंत पडलेलं आहे.
काय आहे कोहिनुर प्रकरण?
शिवसेना भवनासमोरील कोहिनूर मिल-३ या जागेत उभारल्या जाणाºया कोहिनूर स्केअर टॉवर या सुमारे २,१०० कोटींच्या प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा ईडीला संशय आहे. या कथित गैरव्यवहारप्रकरणी कोहिनूर समूहाचे संचालक उन्मेष जोशी व अन्य भागीदार राजन शिरोडकर यांची गेले तीन दिवस चौकशी झाली.
त्यानंतर त्यांचे भागीदार असलेले मातोश्री कन्स्ट्रक्शनचे राज ठाकरे यांची काल ईडीने तब्बल ९ तास चौकशी केली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे चिरंजीव उन्मेष जोशी यांचीही तब्बल २४ तास चौकशी झाली. तर राजन शिरोडकर यांची १३ तास ईडीने चौकशी केली. २६ ऑगस्टला त्यांची पुन्हा चौकशी होणार आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.