समजा तुम्ही रेल्वेने प्रवास आहात आणि अचानक तुमचा मोबाईल किंवा इतर किंमती वस्तू चालत्या रेल्वेमधून खाली पडली तर तुम्ही काय कराल ? अशावेळी रेल्वेतील चैन खेचून रेल्वे थांबवण्याचा विचार तुमच्या मनात येईल. प्रवाशांना सहसा याबाबतीतच्या कायद्यांविषयी माहिती नसते.
अनेकदा मोबाईल किंवा इतर वस्तू पडल्यास प्रवाशी रेल्वेची चैन खेचून रेल्वे थांबवतात. पण असे करणे कायद्याने गुन्हा आहे. असे करणाऱ्यांना दंड होऊ शकतो आणि त्यांना तुरुंगातही जावं लागू शकते.
रेल्वेची चैन खेचण्याचे नियम काय आहेत ?
तुम्हालाही रेल्वेची चैन खेचण्याचे नियम माहित नसतील तर तुरुंगाची हवा करावी लागू शकते. रेल्वेमध्ये तुम्ही पुढील परिस्थितीतच चैन खेचू शकता : १) जर एखादा सहप्रवासी किंवा मूल राहिले आणि रेल्वे सुटल्यास २) रेल्वेत आग लागल्यास ३) वयस्कर किंवा दिव्यांग व्यक्तीला रेल्वेत चढण्यास वेळ लागत असेल आणि रेल्वे सुटल्यास ४) अचानक डब्यात कुणाची तब्येत बिघडल्यास (फेफरे भरल्यास किंवा हृदयविकाराचा झटका आल्यास) ५) रेल्वेमध्ये झटापट, चोरी किंवा दरोड्याची घटना घडल्यास.
रेल्वेतील या साखळीचे नावच अलार्म चैन असते. ही साखळी ओढणे म्हणजे रेल्वे ड्रॉयव्हरसाठी एकप्रकारचा अलार्मच असतो. ही चैन खेचल्यानंतर रेल्वेची गती हळूहळू कमीकमी होत जाते. पूर्वी रेल्वे डब्याच्या भिंतीवर अनेक ठिकाणी ही चैन लावली जायची, परंतु त्याचा गैरवापर वाढल्यानंतर या चैनही संख्या कमी करण्यात आली. आता डब्याच्या मधोमध असणाऱ्या कंपार्टमेंटमध्ये ही चैन असते.
चालत्या रेल्वेमधून मोबाईल किंवा इतर वस्तू खाली पडल्यास परत कशी मिळवाल ?
अनेकदा चालत्या रेल्वेमधून आपला मोबाईल किंवा इतर किंमती वस्तू पडल्याच्या घटना घडतात. जर तुमचा मोबाईल किंवा इतर वस्तू एखाद्या निर्मनुष्य जागी पडली तर ती सापडण्याची ९०% शक्यता असते. त्यासाठी तुम्हाला फक्त एकच काम करावे लागेल, तुमचा मोबाईल किंवा इतर किंमती वस्तू रेल्वेतून खाली पडल्या पडल्या खाली ती कुठे पडली हे बघण्याऐवजी समोर रेल्वे रुळांच्या कडेला असणाऱ्या इलेक्ट्रिक पोलवरचा नंबर लिहून घ्या.
त्यानंतर RPF च्या हेल्पलाईनवर कॉल करुन त्यांना आपला मोबाईल किंवा वस्तू कुठल्या दोन स्टेशनच्या मध्ये आणि किती नंबरच्या पोलच्या जवळ पडली आहे. RPF तुमचा मोबाईल किंवा वस्तू शोधून काढेल. तुम्हाला परत त्याच स्टेशनवर जाऊन तुमची ओळख सांगू आपला मोबाईल किंवा वस्तू परत मिळवता येईल.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.