माणसाच्या मनाला कुठलंही रहस्य जाणून घेण्याचं फार कुतूहल लागलेलं असतं. कधी एकदा ते रहस्य जाणून घेतोय असे त्याला वाटते. आजदेखील आपल्या पृथ्वीच्या पोटात अशी कित्येक रहस्य दडली आहेत, ज्या रहस्यांमागची कारणे अद्यापपर्यंत उलगडली नाहीत.
आज आपण अशाच एका रहस्यावर बोलणार आहोत. आपल्या पृथ्वीवर अशी एक रहस्यमयी जागा आहे, जिथे कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण काम करत नाही. ती सरळ बंद पडतात. चला तर पाहू काय आहे हे रहस्य…
मेक्सिकोमधील रहस्यमयी “झोन ऑफ सायलेन्स”
मेक्सिको त्याच्या ऐतिहासिक पर्यटन आणि खाद्यसंस्कृतीसोबतच रहस्यमयी ठिकाणांसाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोल्सन डी मॅपिमी जवळच एक ओसाड क्षेत्र आहे ज्याला “झोन ऑफ सायलेन्स” म्हणून ओळखले जाते.
आपल्या नावाप्रमाणेच हे क्षेत्र इथे कुठल्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणाच्या माध्यमातून होणारे संभाषण किंवा दूरसंचार रहस्यमयी पद्धतीने गिळंकृत करते. त्यामुळे इथे इलेक्ट्रॉनिक उपकरणे काम करत नाहीत. शास्त्रज्ञ अद्याप यामागचे थोडं कारण शोधू शकले नाहीत. हे ठिकाण असामान्यपणे रेडिओऍक्टिव्ह असण्यामुळे अशी परिस्थिती असल्याचे सांगितले जाते.
कसा लागला या जागेचा शोध ?
झोन ऑफ सायलेन्सच्या ठिकाणची पहिली रहस्यमयी घटना सन १९४० च्या दशकात उजेडात आली. फ्रान्सिस्को सराबिया नावाचा विमान पायलट आपले विमान घेऊन या क्षेत्रावरून जात असताना त्याला विचित्र अनुभव आले. त्याच्या विमानातील उपकरणे नियंत्रणाबाहेर जाऊन विचित्रपणे व्यवहार करत होती. त्याच्या विमानातून ना कुठला सिग्नल बाहेर जात होता, ना कुठला बाहेरचा सिग्नल आत येत होता. शेवटी कसाबसा आपला जीव वाचवून तो बाहेर पडला.
दुसरी घटना १९७० मध्ये घडली. अमेरिकन सेनेने आपल्या नियमित सैन्य सरावांतर्गत उटामधील ग्रीन रिव्हर सैन्यतळाहून व्हाईट सेंड क्षेपणास्त्र तळाच्या दिशेने एक ड्रिल ऑपरेशनसाठी बनवलेले क्षेपणास्त्र डागले.
काही क्षणांनंतर सैन्यतळाने क्षेपणास्त्रावरील आपले नियंत्रण गमावले आणि क्षेपणास्त्र मॅपिमीजवळच्या ओसाड भागात जाऊन पडले. अपघाताबद्दल तपास करण्यासाठी अमेरिकन वायुसेना गेली. शास्त्रज्ञ जेव्हा त्याठिकाणी गेले तेव्हा त्यांच्या कंपासची दिशादर्शक अचानक जोरदारपणे सुई गोल फिरायला लागली.
असे पडले झोन ऑफ सायलेन्स नाव
हे ठिकाण सर्वप्रथम त्यावेळेस चर्चेत आले होते ज्यावेळेस याठिकाणी एकदा नाही तर दोन वेळा उल्कापात झाला होता. १९३८ मध्ये आणि १९५४ मध्ये याच ठिकाणी उल्कापात झाला होती. १९६६ मध्ये एक ऑइल लॅम्पनी तेलाच्या शोधात याठिकाणी आलाय असताना कंपनीने या क्षेत्राच्या ५० किमी परिसरात शोध घ्यायला सुरुवात केली.
परंतु त्यांची सगळी उपकरणे, रेडिओ सिग्नल, दूरध्वनी काम करणे बंद झाल्याने ते हैराण झाले. त्यावेळी या ठिकणाचे नाव “झोन ऑफ सायलेन्स” ठेवण्यात आले.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.