कोरोनाला हरवून आल्यावर मुलीचा तुफान डान्सच्या वायरल व्हिडीओ मागची खरी गोष्ट वेगळीच आहे ?

सध्या सोशल मिडीयावर कोरोना पेशंट बरा होऊन आल्यावर त्याच्या स्वागताचे अनेक व्हिडीओ वायरल होत असतात. यामध्ये नुकताच एक नवीन व्हिडीओ आला आहे ज्यामध्ये एक मुलगी “टाय टाय फीस” या गाण्यावर तुफान नाचताना दिसत आहे. अनेकांनी तो व्हिडीओ शेअर केला आहे परंतु या व्हिडीओ मधील मुलगी कोण आहे व त्या मागची गोष्ट अनेकांना माहिती नाही.

तर हा व्हिडीओ पुण्यातील आंबेगाव पठार येथील मोहन नगर भागात शूट झालेला आहे. आणि या व्हिडीओ मध्ये दिसणारी मुलगी सलोनी सातपुते हि आहे. आणि व्हिडीओ मध्ये दुसरी दिसणारी मुलगी हि तिची बहिण आहे, ती कोरोनावर मात करून आल्यावर तिने आनंदात तिचे वरील प्रकारे स्वागत केले आहे. सलोनी हि इंजिनियरिंगची विद्यार्थी आहे आणि ती प्रोफेशनल डान्सर देखील आहे.

परंतु या सर्व गोष्टी मागची कहाणी वेगळी आहे. तर झाले असे कि सलोनीचे वडील कापड दुकानात काम करतात, सर्व प्रथम त्यांच्यात कोरोनाचे लक्षणे दिसली आणि ४ जुलै ला त्यांना पुणे मधील भारती हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले. त्यानंतर तिचे आजी आजोबा, आई आणि बहिण देखील कोरोनाचे लक्षणे आढळले. घरात ती फक्त एकटी निगेटिव्ह आली. परंतु त्यानंतर तिच्या सोबत शेजारी पाजारी वेगळ्या पद्धतीने वागू लागले.

घरात ती एकटी राहली होती आणि तिला कोणी आधार द्यायला नव्हते. परंतु एक एक करत सगळे बरे झाले मागील शुक्रवारी तिची बहिण स्नेहल हिला सुट्टी मिळाली त्यानंतर तिने तिचे स्वागत करण्याचे ठरविले आणि डीजे लावून तिचे तुफान स्वागत केले आहे. सलोनीला नाचताना पाहून तीची कोरोनातून बरी झालेली बहिण सुद्धा तीच्या आनंदाच सामिल झाली अन् नाचायला लागली.

या गोष्टीवरून एक नक्की लक्षात येते कि कोरोना पेशंटच्या नातेवाईकांना मानसिक आधाराची गरज असताना समाज त्यांच्या बरोबर जी वागणूक देतो ती योग्य नाही आहे. या सर्व टेन्शन मध्ये तिला तिच्या काही जवळच्या मित्र मैत्रिणीनी साथ दिली त्यामुळे तिचे मानसिक स्वास्थ चांगले राहिले असे ती सांगते.

आयुष्य हे एक महोत्सव आहे आणि ते साजरे केले पाहिजे. कोरोनासारखा रोग ज्यावर अजून लस सापडली नाही आहे. म्हणून घाबरून जाणारे गलितगात्र होणारे अनेक जण आहेत. या सर्वांनाच सलोनीने दाखवून दिलं आहे. कितीही संकटे आली तरी खचू नका give up करू नका we will win…असं सलोनीची बहिण स्नेहल सातपुते हिनं सांगितलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.