काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी-वढेरा या गांधी कुटुंबातील तीनही सदस्यांची एसपीजी कमांडोंची सुरक्षाव्यवस्था केंद्र सरकारने नुकतीच काढून घेतली असून केंद्रीय राखीव पोलिसांचा समावेश असलेली झेड प्लस सुरक्षा त्यांना पुरवण्यात आली आहे. या निर्णयानंतर मोठी नाराजी काँग्रेसकडून व्यक्त करण्यात आली.
सोनिया गांधी या सध्या काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष आहेत तर प्रियांका गांधी यांच्याकडे सध्या पूर्व उत्तर प्रदेशच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी आहे. तसेच त्यांच्याकडे काँग्रेसचे सरचिटणीस पद देखील आहे. प्रियांका या पूर्वी राजकारणात फार ऍक्टिव्ह नव्हत्या. पण उत्तर प्रदेशमध्ये त्यांनी पक्षाची जबाबदारी घेत सक्रिय राजकारणास सुरुवात केली होती.
त्या सक्रिय राजकारणात आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसला अपयश आले. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुकात अपयश आल्यानंतर राहुल गांधी यांनी पदाचा राजीनामा दिला. प्रियांका गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाचे नेतृत्व द्यावे अशी मागणी नेहमीच होत आली आहे.
यापूर्वी प्रियांका गांधी कोणत्याही पदाशिवाय पडद्यामागे काँग्रेससाठी काम करत होत्या. निवडणुकीत काँग्रेसच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावत होत्या. तसंच महत्त्वाच्या रणनीतीही आखत होत्या. पण त्या आता अधिकृतपणे राजकारणात आल्याचे देशभर प्रचार करताना बघायला मिळाल्या. त्यादरम्यान त्यांची गाडी चर्चेत आली होती.
प्रियांका गांधीकडे असलेली गाडी म्हणजे रस्त्यावर धावणारा हत्ती!
निवडणूक प्रचारात प्रियांका गांधी सर्वात जास्त कोणत्या गाडीचा वापर करतात याविषयी बरीच चर्चा झाली होती. प्रियांका गांधी यांच्याकडे एकूण ५ गाड्या आहेत. पण या पाच गाड्यांपैकी त्यांची आवडीची गाडी म्हणजे टाटा सफारी आहे. त्या निवडणुकीत प्रचारासाठी हीच गाडी वापरतात. प्रियांका गांधी यांच्याकडे टाटा सफारीसह फोर्ड, जॅग्युआर, टोयोटा फॉर्च्यूनर अशा एकूण पाच गाड्या आहेत.
काय आहे त्यांच्या आवडत्या सफारीचे वैशिष्ट्य-
प्रियांका गांधी या मोठ्या राजकीय कुटुंबातून येतात. गांधी कुटुंबांना एसपीजी सुरक्षा देण्यात यायची पण ती नुकतीच काढण्यात आली. त्यांच्या गाडयांना विशेष प्रकारे बनवण्यात आलेले आहे. त्यांची टाटा सफारी अत्याधुनिक फीचर सोबत बनवलेली आहे. या गाडीच्या चारही बाजुने एनआयजे लेवलचे ३ बीपी प्रोटेक्शन ग्लास लावले आहेत. आर्म्ड टाटा सफारीत ५ एग्झिट दरवाजे आहेत.
या गाडीचे आणखी एक खासियत म्हणजे या गाडीवर हँड ग्रेनेड फेकला तरी या गाडीचे काहीही नुकसान होत नाही. या गाडीला १५० किलोमीटर ताशी वेग आहे.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.