नुकताच राष्ट्रवादीचे साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाच्या चांगल्याच चर्चा राज्यभरात झाल्या. उदयनराजेंनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, जे पी नड्डा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला.
उदयनराजे हे पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती होती. स्वतः उदयनराजेंनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून नरेंद्र मोदी हे पक्षप्रवेशाला उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. पण प्रत्यक्षात मात्र मोदी या पक्षप्रवेशाला उपस्थित राहिलेच नाही.
मोदी उपस्थित न राहिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. मोदींची अनुपस्थिती चांगलीच चर्चेचा विषय बनली होती. पण मोदी का उपस्थित राहिले नाही याचे कारण देवेंद्र फडणवीस यांनी आज कराड मध्ये पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले आहे.
…म्हणून उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला पंतप्रधान गैरहजर राहिले-
पंतप्रधानांना कुठल्याही राजकीय पक्षप्रवेशाला उपस्थित राहता येत नाही. हा राजकीय शिष्टाचार आहे. त्यामुळे उदयनराजेंच्या पक्षप्रवेशाला नरेंद्र मोदी आले नाहीत.
पंतप्रधान मोदींनी उपस्थित राहावे अशी अटच उदयनराजेंनी भाजप प्रवेशासाठी घातली होती. सोबतच सातारा लोकसभा मतदार संघाची निवडणूक विधानसभेसोबत व्हावी अशी त्यांची अट होती. त्या मान्य झाल्यानंतर पक्षप्रवेश होणार होता. परंतु, उदयनराजे यांच्या पक्ष प्रवेशावेळी पंतप्रधान मोदी उपस्थित नव्हते. यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना याबाबत खुलासा करावा लागला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत भाजपात पक्षप्रवेश करणार असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं होतं. मात्र प्रत्यक्षात उदयनराजेंच्या भाजपा पक्षप्रवेशावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा आणि जे.पी नड्डा उपस्थित होते.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.