महाराष्ट्रात या तीन प्रसंगी राष्ट्रपती राजवट लागू झाली होती

राष्ट्रपती राजवट म्हणजे असते तरी काय ?

भारतीय संविधानानुसार एखाद्या राज्यात घटनात्मक सरकार चालवण्यात अपयश आले तर राज्याचे राज्यपाल त्यासंबंधीचा अहवाल देशाच्या राष्ट्रपतींकडे पाठवतात. त्या अहवालावर राष्ट्रपती संबंधित राज्यामध्ये खरोखरच तसा घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे का याची स्वतः खातरजमा करतात.

त्यांनतर संबंधित घटकराज्यात घटनेच्या कलम ३५६ लागू करुन काही कालावधीकरता त्या राज्याचा कारभार स्वतःच्या ताब्यात घेतात. यालाच राष्ट्रपती राजवट लागू झाली असे म्हणतात. याकाळात राज्यपाल राष्ट्रपतींच्या निर्देशानुसार संबंधित राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून कारभार पाहतात.

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचे तीन प्रसंग

१) महाराष्ट्रात सर्वात पहिली राष्ट्रपती राजवट १९८० मध्ये लागू करण्यात आली होती. आणिबाणीनंतरच्या काळात इंदिरा गांधी पराभूत झाल्या आणि काँग्रेसमध्ये फूट पडली आणि दोन काँग्रेस एकमेकांविरोधात लढल्या. नंतर दोन्ही काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले.

शरद पवार ४० आमदारांचा गट घेऊन बाहेर पडले आणि पुलोद सरकार स्थापन केले. त्यानंतर इंदिरा गांधी पुन्हा सत्तेत आल्या आणि त्यांनी शरद पवारांच्या नेतृत्वाखालील सरकार बरखास्त केले. त्यावेळी १७ फेब्रुवारी १९८० ते ९ जून १९८० दरम्यान पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट लागू झाली.

२) महाराष्ट्रात दुसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट २०१४ मध्ये लागू करण्यात आली. आघाडी सरकारमध्ये घटकपक्ष असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद झाल्याने राष्ट्रवादीने आघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता.

त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले आणि महाराष्ट्रात २८ सप्टेंबर २०१४ ते ३१ ऑक्टोबर २०१४ या ३२ दिवसाच्या कालावधीत राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. त्यांनतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणूका होऊन फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत आले होते.

३) महाराष्ट्रात तिसऱ्यांदा राष्ट्रपती राजवट २०१९ मध्ये लागू करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीत कुठल्याच पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आणि महायुतीच्या प्रमुख घटकपक्ष भाजप आणि शिवसेनेत मुख्यमंत्री पदावरून मतभेद झाल्याने कुठल्याच पक्षाला सरकार स्थापनेचा दावा करता आला नाही.

शेवटी १२ नोव्हेंबर २०१९ रोजी राज्यपालानी महाराष्ट्रात घटनात्मक सरकार स्थापन होणे कठीण होण्याचा अहवाल राष्ट्रपतींना पाठवला. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.