आजपर्यंत आपण अनेकदा कारगिल युद्धातील वीरप्रसंग बघितले असेल परंतु जेव्हा सैनिक सीमेवर लढतो तेव्हा त्याच्या कुटुंबाच्या मनात काय विचार चालतात हे फार कमी ठिकाणी आपल्याला दाखविले जाते. पुणे येथील प्रणय जाधव याने वडील कारगिल युद्धात असताना त्याच्या मनातील घालमेल फेसबुक वर पोस्ट केली आहे.
पोस्ट खालील प्रमाणे आहे,
कारगिलचं युद्ध मी व माझ्या कुटुंबासाठी एक भावनिक विषय आहे. पप्पा 108 युनट बरोबर कारगिल मध्ये होते संपूर्ण साठ दिवस माझे कुटुंबीय माझे वडील जिवंत माघारी यावेत येवढीच प्रार्थना करत होते. तेव्हा फोन नव्हते मी फारच लहान होतो आई सांगते युद्धावर जाण्या आधी ते मला अणि माझ्या बहिणीला कडकडून मिठी मारून गेले होते काय भावना असतिल त्यांच्या मानत तेव्हा.
बर्याचदा वडिलांबरोबर त्या लढाई बदल बोललो आहे. त्यांनी ही मला त्या अतिशय कठीण साठ दिवसांन बदल सांगितले आहे. त्यांचे ट्रेनिंग पासूनचे अनेक सहकारी पप्पांनी गमावले. अनेक दिवस खायला मिळायचे नाही. रात्रभर फायरिंग अणि shelling चालू असायचे. दिवसभर डोंगर चढायला लागायचा सर्व वजन बरोबर घेऊन. तेव्हा मोबाईल नव्हते रोज शहीद सैनिकांचा आकडा कळायचा अनेक डेड बॉडी त्या आर्मी क्वार्टर्स मध्ये यायचे मी सात वर्षांचा होतो.
अचानक एखादी बॉडी यायची सलामी दिली जायची माझे मित्र, त्यांची आई रडायची अणि ते कुटुंब त्याच गाडीतून कायमस्वरूपी तिथून निघून जायचे. त्या लहान वयात ही दुःख ही भावना तीव्रपणे जाणवायची. ती मुले परत शाळेत. स्कूल बस मध्ये दिसायची नाहीत त्या वयात मिस करायचो आपल्या मित्रांना.
सकाळी पप्पा ना कॉल केला शेतात होते होता त्यांचे अभिनंदन केले. पप्पा सांगत होते अरे तेव्हा सरकार ने casualty चे जे आकडे दिले होते त्यापेक्षा मारणाऱ्या सैनिकांची संख्या खूपच जास्त होती. मी माझे कुटुंबीय भाग्यवान होतो की पप्पा सुखरूप परत आले.
आज सहज ही गोष्ट तुम्हाला सांगाविशी वाटली. युद्ध जिंकल्याचा आनंद, काहीसा माज आज अनेक स्टेटस मध्ये पहिला. त्या विजयाची किमत फार मोठी होती एवढच सांगू इच्छितो…