सलग चौथ्यांदा निवडून आलेले भारतातील सर्वात गरीब मुख्यमंत्री…

त्रिपुराचे मुख्यमंत्री म्हणून सलग चौथ्यांदा निवडून आलेले माणिक सरकार कदाचित देशातील सर्वच मुख्यमंत्र्यापैकी सर्वात गरीब आहेत. सलग चौथ्यांदा मुख्यमंत्री होऊनही त्यांचा मिडिया कधीही गाजावाजा करताना दिसत नाहीत म्हणून आम्ही खासरेवर देत आहोत त्यांच्या विषयी माहिती..

ते चौथ्यांदा सलगपणे मुख्यमंत्री म्हणून निवडून आले आहेत, नरेंद्र मोदी यांच्यापेक्षाही जास्त वेळ,पण आपल्या प्रसार माध्यमांनी त्यांची कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही किंवा प्रसिद्धी दिली नाही.

त्यांना स्वतःचे घर सुध्दा नाही. ते त्यांचा सर्व त्यांच्या पक्षाला देतात आणि पक्ष त्यांना ५००० रुपये रुपयाचा भत्ता देतो. त्याचे विरोधकही सांगतात की माणिक सरकार हे एक प्रामाणिक व्यक्ती आहेत, आज निश्चितच ते इतर राजकारण्यांपेक्षा एक दुर्मिळ व्यक्तिमत्व आहे.

आता कोट्यवधी रुपयांची संपत्ती असलेल्या इतर मुख्यमंत्री किंवा राजकारण्यांबरोबर त्यांची तुलना करून बघा!

माणिक सरकार ने राज्यामध्ये विकास भरपूर केला आहे, ज्यामध्ये राज्यात चांगली कनेक्टिव्हिटी आणि आयटी क्षेत्राचा विकास समाविष्ट आहे. सार्वजनिक-खासगी सहभागाची संकल्पना आणण्याचे श्रेय त्यांनाच जाते. नेहमी पांढरा कुर्ता आणि पजामा घालणारे ६४ वर्षीय या दिग्गजा जवळ केवळ १,०८०रुपये रोख रुपये आहेत. २००३साली त्यांनी ३,००० रुपये रोख रक्कम निवडणूक अर्जात माहिती दिली होती.

२००८ मध्ये, त्याच्या जवळ एकूण आणि बँकेच्या ठेवींमध्ये १६,१२०.३८ रुपये होते. जे गेल्या पाच वर्षांत ५,३२० रुपयांनी कमी झाले आहेत. त्यांच्या शपथपत्रानुसार त्यांनी हा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. आगरताळाच्या SBI बँकेत(खाते क्रमांक 01190058811) माणिक सरकारचे एकच बचत खाते आहे आणि त्यात ९,७२०.३८ रुपये एवढीच ठेव जमा आहे. २००८ मध्ये, त्यांच्याकडे त्याच शाखेतील दुसऱ्या बचत खात्यात(खाते क्रमांक 10915315442) ८९९२ रुपये जमा होते.

त्यांची पत्नी पांचाली भट्टाचार्य एक निवृत्त सरकारी कर्मचारी असून त्यांच्या आर्थिक स्थितीच्या अनिवार्य घोषणापत्रानुसार सरकारच्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की त्यांच्याकडे २२,०१५ रुपये एवढी रोख रक्कम आहे. मागील पाच वर्षांत सरकार यांच्या जवळील सोन्यामध्ये फक्त १० ग्रॅम नी वाढ झाली आहे.

त्यांची पत्नी जी आता सेवानिवृत्त झाली आहे त्यांना सेवानिवृत्ती नंतर मिअलालेले पैसे २४,९२,३९५ रुपयांची रोख रक्कम बँकेत जमा ठेवली आहे. त्यापैकी १८,९३० आणि ८४,११८ रुपये रक्कम ही दोन बचत खात्यांमध्ये आहेत. उर्वरित इतर मुदत ठेवींच्या स्वरूपात आहे. पाच वर्षांपूर्वी एसबीआयमधील त्याच्या खात्यात ४९,१९३ रुपये आणि उर्वरित खात्यात ८०,०८० रुपये बचत खात्यात जमा होती. त्यांचा फक्त ६,५३,४५३ रुपयांचा भविष्यनिर्वाह निधिची ठेवही आहे.

माणिक सरकारकडे एकही वाहन नाही.हा मुख्यमंत्री आपले शासकीय वाहनाचाच वाहतुकीसाठी वापर करतो,आणि त्यांची पत्नी आजही रिक्षामधूनच प्रवास करतात. त्याच्याकडे ई-मेल खाते नाही,आणि त्यांनी मोबाईलही घेतला नाही. त्यांच्या शासकीय निवासस्थानी आणि कार्यालयात फक्त लँडलाईन फोनचाच ते वापर करतात.

२००९ मध्ये त्यांची आई कृष्णागार यांच्या मृत्यूनंतर त्यांनी आपल्या बहिणीसह ०.०१ एकरमध्ये शेती केली होती. माणिक सरकार १९७१च्या बॅचचे बीर बिक्रम कॉलेज ऑफ अगरताळा मधील वाणिज्य शाखेचे पदवीधर आहेत.

मला वाटते की ते आपल्याकडून काहीही मागणार नाहीत पण त्यांच्याविषयी आदर आणि त्यांना थोडी ओळख मिळावी म्हणून,ही पोस्ट सर्वांना शेअर करा आणि या महान व्यक्तीला प्रसिद्धी द्या…

वाचा सलग तीनदा निवडून आलेले अपक्ष आमदार बच्चू कडू यांच्या विषयी माहिती नसलेल्या गोष्टी..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.