वाचा गाडीवरील कुटूंबास हात जोडणा-या पोलीसाच्या वायरल फोटो मागचे सत्य

एका पोलीस अधिकाऱ्याने आंध्र प्रदेशातील अनंतपुर जिल्ह्यात मोटारसायकलवर आपल्या कुटूंबातील 4 सदस्यांना घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला हाथ जोडल्याचा फोटो सध्या इंटरनेटवर प्रचंड वायरल झाला आहे.

अनंतपूर च्या मदकासीरा सर्कल चे इन्स्पेक्टर बी. शुभकुमार हे आपल्या कामासाठी निघाले असता, त्यांना हनुमंता रायडू नावाची एक व्यक्ती आपल्या गाडीच्या पेट्रोलच्या टाकीवर आपल्या 2 मुलांसह मागे आपल्या पत्नी व नातेवाईकांस घेऊन जाताना दिसले. त्यावेळी त्यांनी या व्यक्तीस हाथ जोडले होते. तिथे उपस्थित इतर व्यक्तींनी हा फोटो काढून इंटरनेटवर टाकला असता, तो खूप वायरल झाला आहे.

शुभकुमार म्हणाले की, ‘ मी नेमकेच एका रस्ता सुरक्षा जागरूकता च्या कार्यक्रमातुन बाहेर पडलो तर मला तो व्यक्ती 5 जणांना गाडीवर बसवून बेदरकारपणे गाडी चालवल्याचे बघितले. रस्ता सुरक्षा जागरूकतेच्या कार्यक्रमात तो व्यक्तीही उपस्थित होत. नेमकेच दीड तास कार्यक्रमास उपस्थित राहून पण कोणी कसे अशे परिवाराला धोक्यात घालून गाडी चालवू शकते. माझं डोकं थोड्या वेळा साठी काम करणे बंद झालं होतं. ते दृश्य पाहून मी फक्त निराशपणे आणि असहायरीत्या फक्त हाथ जोडू शकत होतो. मी त्याला त्याच्या कुटुंबाच्या सुरक्षेची जबाबदारी विषयी सांगितले, कारण ती त्याच्यामध्ये थोडीपन नव्हती. त्याचे मुलं टाकीवर बसल्यामुळे त्याला हँडल वळवण्यास ही अडचण होऊ शकत होती. हे दृश्य पाहून मी सुन्नच झालो होतो. कारण अपघात अशाच निष्काळजीपणामुळे होतात.’

Road-Safety

पोलिसांनी सांगितले की हा व्यक्ती अगोदर ही गाडी निष्काळजीपणाने चालवताना आढळलेला आहे. पोलसांनी त्याला बरेच वेळा नोटीस ही दिलेली होती. तो जेव्हा कुटुंबासोबत गाडीवर जात होता तेव्हा त्याने हेल्मेट ही घातलेले नव्हते. त्याने त्याच्या कुटुंबाला तर धोक्यात घातलेच होते सोबत इतरांनाही धोका संभवत होता.

त्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, ‘ तो भाग एक अत्यंत दुर्गम भाग आहे. जिथे नागरिकांमध्ये वाहतूक सुरक्षेविषयी थोडीही जाणीव नाही. आम्ही तिथे लोकांमध्ये जागरूकता निर्मान व्हावी यासाठी शिबिर घेण्यास सुरुवात केली आहे. शिबिरात लोकांना रस्ते सुरक्षेचे व्हिडीओ, हेल्मेट वापरण्याचे महत्व, ओव्हरलोडिंगचे धोके, अपघात कसे घडतात, याची माहिती देत आहोत. मागील चार महिन्यांपासून हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. ज्या व्यक्तींनी आपल्या कुटुंबातील कोणी तरी सदस्य गमावला आहे,त्यांची छोटीशी मुलाखत ही तिथे दाखवण्यात येत आहे. पण हे अशे काही व्यक्ती आपल्या कुटुंबातील सदस्याप्रति एवढे असंवेदनशील कसे असू शकतात. हे खुप निराशाजनक आहे.’

माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.