मंत्र्याच्या मुलाला रात्री फिरण्यापासून रोखलं, महिला कॉन्स्टेबलला द्यावा लागला राजीनामा

पोलिसांच्या बेधडक कारवाईच्या काही गोष्टी आपल्याला फक्त सिनेमातच बघायला मिळतात. याच गोष्टी जर खऱ्या आयुष्यात बघायला मिळणे थोडे कठीण काम असते. पण पोलिसांनी असे काम केले आहे जे ऐकून तुम्ही शाबासकी द्याल. पोलीस एखाद्या मंत्र्याच्या पोराला नीट करतील यावर विश्वास बसणं थोडं कठीण आहे पण हे खरोखर घडलं आहे.

एका मंत्र्याच्या मुलाला सध्या कर्फ्यू असल्यामुळे रस्त्यावर फिरण्यापासून रोखले आहे एका महिला पोलीस कॉन्स्टेबल ने. या महिला कॉन्स्टेबलने मंत्र्याच्या मुलाला धडा देखील शिकवला आहे. हि घटना घडली आहे गुजरातच्या सुरतमध्ये.

आपले वडील मंत्री असल्यामुळे रात्री मित्रांसोबत बिनधास्त फिरायला निघालेल्या या तरुणांना या कॉन्स्टेबलने रोखले आणि घरी पाठवले. एवढेच नाही तर लोकांमध्ये त्याचा चांगलाच समाचार देखील घेतला. या महिला कॉन्स्टेबलचे नाव आहे सुनीता यादव. पण सुनीताने त्या मंत्र्याच्या मुलाला धडा शिकवल्यानंतर तिला राजीनामा देण्याची वेळ आली. जाणून घेऊया पूर्ण घटना.

नेमकं काय घडलं?

सुनीता यादव सुरतमध्ये ड्युटीवर तैनात होती. बुधवार ८जुलै रोजी रात्री १०.३० वाजता मंगध चौकात हि घटना घडली. सुनीता ड्युटीवर असताना तिथून कर्फ्यू असताना एक कार आली. या गाडीमध्ये ५ लोक होते जे आरोग्य राज्यमंत्री कुमार कानानी यांचे समर्थक होते. त्यांनी मास्क देखील लावलेले नसल्याने सुनीताने त्यांना रोखले आणि चौकशी केली.

सुनीताने गाडीची चावी काढून घेतली. त्यातल्या एका युवकाने मंत्री कुमार यांच्या मुलाला तिथे बोलावले. जेव्हा सुनीताने त्यांना विचारले कि कर्फ्यू असताना का फिरताय तर त्यातल्या एकाने मी मंत्र्यांचा मुलगा प्रकाश असल्याचे सांगितले. तर दुसरे तरुण सुनितासोबत गैरवर्तन करायला लागले.

त्यावर सुनीताने त्यांना सुनावले कि तुम्ही मंत्र्यांचा मुलगा म्हणल्यावर सर्वात आधी तुम्ही नियम पाळले पाहिजे. तुम्हाला रात्री फिरायला कोणी सांगितले. सुनीताने मंत्र्यांसोबत देखील फोनवर बोलणं केलं. तिने मुलगा फिरत आहे हे माहिती आहे का त्यांना विचारले. मंत्र्यांनी देखील तिला उद्धटपणे माझी गाडी आहे माझा मुलगा घेऊन फिरतोय तर तुला काय त्रास आहे असे उत्तर दिले.

सुनीताने हि घटना आपल्या वरिष्ठाना सांगितली. त्यांनी सुनीताला घरी जाण्यास सांगितले. पण या समर्थकांनी एक क्लिप व्हायरल केली आहे ज्यात मंत्र्यांचा मुलगा सुनीताने धमकी देतोय कि मी तुला या एकाच ठिकाणी ३६५ दिवस उभा करू शकतो. यावर सुनीताने उत्तर देताना म्हंटले आहे कि मी तुझ्या बापाची नौकर नाही जी इथे ३६५ दिवस उभा राहील.

या घटनेनंतर सुनीताचे दुसऱ्या भागात ट्रान्स्फर करण्यात आले. बदली केल्यानंतर सुनीताने कॉन्स्टेबल पदाचा राजीनामा दिला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या घटनेचे चौकशीचे आदेश देऊन मंत्र्यांचा मुलगा प्रकाश आणि त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.