सध्या कोरोनाचं संकट किती भयंकर बनलेलं आहे हे आपण सर्व जण जाणतो. कोरोनाची भीती लोकांमध्ये राहिली नाही हि वेगळी बाब आहे. तरीदेखील सध्या छोट्या छोट्या कारणासाठी दवाखान्यात जाणं टाळायला हवं. कारण दवाखान्यातून कोरोनाचे संक्रमण होण्याची भीती असते. लॉकडाऊनमध्ये आपला बराच वेळ घरात बसून गेला आहे. त्यामुळे अनेकांना लठ्ठपणा, पोट साफ न होणे, ऍसिडिटी सारखे अनेक आजार उद्भवू शकतात.
पण या आजारांवर एक गोष्ट मात करण्यास मदत करू शकते. या घरगुती उपचारांचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. आपण रोजच्या आहारात शेंगदाने वेगवेगळ्या प्रकारे खातो. पण हेच शेंगदाणे जर आपण भिजवून खाल्ले तर त्याचे असंख्य फायदे आहेत. ड्रायफ्रूट्स जसं खायला चांगले असतात पण ते प्रत्येकाला सहज उपलब्ध होत नाहीत. तसं शेंगदाणे मात्र लवकर सहज उपलब्ध होतात.
रात्री भिजवून शेंगदाणे सकाळी खाल्ले तर ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते. जाणून घेऊया भिजवलेले शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला काय काय फायदे होतात.
हृदयाचे विकार- शेंगदाण्याचे असंख्य प्रभावी गन शरीरास खूप फायदेशीर असतात. हृदयाच्या आजारावर मात करण्यासाठी शेंगदाणे खूप मदत करतात. शेंगदाण्यामध्ये कार्डियोप्रोटेक्टिव हे घटक असते. याच घटकामुळे हृदयाच्या आजारांना दूर ठेवण्यास मदत होते.
बॉडीबिल्डिंग- जर तुम्ही व्यायाम करत असाल तर रोज सकाळी भिजवलेले शेंगदाणे खा. यात असणारे प्रोटीन खूप फायदेशीर ठरते. सकाळी शेंगदाणे खाल्ल्याने तुम्हाला व्यायाम करताना एक वेगळी ऊर्जा मिळेल. दूध आणि अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन शेंगदाण्यामध्ये असतात. हे पाण्यात भिजवून खाणे जास्त फायदेशीर असते. शेंगदाणे पाण्यात भिजवल्याने यामधील न्यूट्रिएंट्स शरीरात पूर्णपणे अब्जॉर्ब होतात.
मेंदूची कार्यक्षमता वाढते- ड्रायफ्रुटप्रमाणे शेंगदाणे देखील मेंदूसाठी खूप फायदेशीर ठरतात. शेंगदाण्यांमध्ये ओमेगा ३ फॅटी एसिड्स असतात. या फॅटी एसिड्समुळे मेंदूची कार्यक्षमता वाढते. सकाळी अभ्यासाला उठणाऱ्या मुलांना देखील शेंगदाणे दिल्यास त्यांचा मेंदू तल्लख बनतो.
त्वचा चांगली राहते- प्रत्येकाला आपली त्वचा खूप चांगली असावी असे वाटते. खासकरून यामध्ये महिलांचा विशेष रस असतो. त्या वेगवेगळे ब्युटी प्रोडक्ट वापरून आपला चेहरा चांगला ठेवायचा प्रयत्न करतात. पण याच ब्युटी प्रोडक्ट मध्ये वेगवेगळे केमिकल्स वापरले जाते. जे त्वचेसाठी खूप घातक ठरते. पण शेंगदाण्याच्या मात्र एंटीऑक्सीडेंट असतात. ज्यामुळे त्वचा खूप चांगली राहते.
पचनक्रिया चांगली राहते- लॉकडाऊन मध्ये सर्वात जास्त तुम्हाला गॅस, अपचन, ऍसिडिटी या समस्यांचा त्रास झाला असेल. शेंगदाण्यात असणाऱ्या डायटरी फायबरमुळे शरीर निरोगी राहत. रोज सकाळी उठून भिजवलेले शेंगदाणे खाल्यास या कुठल्याही समस्या तुम्हाला सतावणार नाहीत.
माहिती महत्वपूर्ण वाटल्यास अवश्य शेअर करा आणि आमचे पेज लाईक करायला विसरू नका. आम्हाला माहीती आपण info@khaasre.com या इमेल आयडीवर पाठवु शकता.