महाराष्ट्राच्या राजकारणाला वर्तुळ मानलं तर बारामतीचे पवार कुटुंब त्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे असं म्हणावे लागेल. महाराष्ट्राचे राजकारण आजदेखील या कुटुंबाच्या अवतीभोवतीच फिरताना दिसेल. भले ते ज्या पक्षात आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राजकारणामध्ये कितीही चढ उतार पाहिलेले असो, त्यांची राजकीय ताकत कितीही असो, राजकारणात पवार कुटुंबाविषयी लोकांमध्ये असणारे आकर्षण अद्याप कमी झाले नाही. किंबहुना दिवसेंदिवस त्यात वाढच होत चालली आहे.
पवार कुटुंबातील सदस्यांमध्ये कितीही किरकोळ गैरसमज असले तरी या कुटुंबातील सदस्य एकत्र बसतात, एकमेकांशी चर्चा करुन आपसातील गैरसमज दूर करतात आणि सुखदुःखाच्या प्रसंगी एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. त्यामुळे अनेकांनी त्यांच्या कुटुंबात कलह माजवण्याचा प्रयत्न करुनही किंवा त्यांच्या कुटुंबात कलह असल्याच्या अफवांना सार्वजनिक चर्चेचा विषय बनवूनही या कुटुंबाच्या एकीवर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आज आपण याच पवार कुटुंबात कोण कोण सदस्य आहेत आणि ते सध्या काय करतात याची माहिती घेणार आहोत.
असे आहे बारामतीचे पवार कुटुंब
गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवार यांना एकूण ११ अपत्ये झाली. त्यात ७ मुले आणि ४ मुलींचा समावेश आहे. क्रमाने त्या सर्वांची नावे सांगायची झाली तर १) वसंतराव, २) दिनकरराव उर्फ आप्पासाहेब, ३) अनंतराव, ४) माधवराव उर्फ बापूसाहेब, ५) सूर्यकांत, ६) सरला, ७) सरोज, ८) शरद, ९) मीना, १०) प्रतापराव, ११) नीला अशी ती नावे आहेत. पवार कुटुंबातील प्रत्येक मुलाने आपापले क्षेत्र निवडून त्यात ते आपले योगदान देत गेले.
पवार कुटुंबातील सदस्य सध्या काय करतात ?
पवार कुटुंबातील थोरले सदस्य वसंतराव हे निष्णात वकील होते. एका कोर्ट प्रकरणात त्यांचा खून झाला. दिनकरराव उर्फ आप्पासाहेब यांनी शेती व्यवसायामध्ये नाव कमावले. अनंतराव हे देखील शेती करायचे, परंतु १९७८ मध्ये त्यांचे निधन झाले. माधवराव उर्फ बापूसाहेब हे प्रसिद्ध व्यावसायिक होते. सूर्यकांत हे नगर रचनाकार होते, ते प्रदेशात स्थायिक झाले. सरलाताई यांचा विवाह जगताप कुटुंबात झाला. सरोजताईंचा विवाह ज्येष्ठ सामाजिक नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्याशी झाला. शरद पवारांनी राजकारणात आपले नाव कमावले. मीनाताईंचा विवाह श्रीरामपूरच्या जगधने कुटुंबात झाला. प्रतापराव पवारांनी सकाळ वृत्तपत्र व्यवसायामध्ये नाव कमावले. सकाळ नीलाताईंचा विवाह सासणे कुटुंबात झाला.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका..