पासपोर्ट मिळविणे हे अतिशय किचकट काम समजल्या जाते त्यामुळे अनेकजण पासपोर्ट घेण्यास टाळतात. परंतु नवीन आलेल्या नियमानुसार फक्त वरील ४ कागद पत्राच्या आधारे देखील आपणास पासपोर्ट मिळविता येतो. आपले काम सोपे करण्यासाठी आम्ही तुम्हाला हि माहिती देत आहोत.
आता हि प्रक्रिया अतिशय सुलभ झाल्याने फक्त ७ दिवसात तुम्हाला पासपोर्ट मिळू शकतो. पोलीस तपासणी करिता अनेकांचा वेळ जातो त्यामुळे पोलीस तपासणी प्रक्रिया हा पासपोर्ट मिळाल्यानंतर केली जाते.
यासाठी महत्वाचे चार कागदपत्र आहेत ते पुढील प्रमाणे १. आधार कार्ड २. मतदार ओळखपत्र ३.पॅनकार्ड ४.गुन्हे नोंद नसल्याबद्दल प्रतिज्ञापत्र घ्यावे लागेल. या कागद पत्राच्या आधारे तुम्ही जलद रित्या पासपोर्ट मिळवू शकता. फक्त पासपोर्ट सेवा निवडताना तुम्हाला तात्काळ हा पर्याय निवडावा लागेल. या प्रक्रियेची फी थोडी जास्त आहे सामान्य पासपोर्ट काढायला आपल्याला फी १५०० रुपये भरावी लागते आणि यासाठी आपली फी आहे फक्त २००० रुपये जास्त म्हणजेच या प्रक्रियेला तुम्हाला ३५०० रुपये एवढे पैसे भरावे लागतील.
या साठी काय करावे लागेल ?
www.passportindia.gov.in या पासपोर्ट सेवेच्या अधिकृत संकेत स्थळास पहिले भेट द्यावी. त्यानंतर आपण एक नवीन वापरकर्ता असल्यास, प्रथम आपले खाते येथे तयार करा. यामध्ये आपल्याला सर्व आवश्यक माहिती देणे अनिवार्य आहे.
आता सर्व कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा. आपल्याला एक ऑनलाइन पेमेंट पर्याय मिळेल. देय झाल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्रात नियोजित भेट घेऊ शकता.
नियुक्ती पावतीच्या प्रिंटआउट काढा. ती पावती तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्रात घेऊन जावी लागेल. आपल्या दस्तऐवजांचे सत्यापन येथे केले जाईल. त्यानंतर, तुम्हाला एका आठवड्यात एक पासपोर्ट मिळेल.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.