१९८९ साली परिंदा नावाचा एक चित्रपट आला होता. केवळ कबुतरांच्या उडण्याच्या एका दृष्यावरुन विधू विनोद चोप्रांना या चित्रपटाची कल्पना सुचली होती. केवळ १२ लाख रुपयांमध्ये या चित्रपट तयार झाला होता. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित देखील या चित्रपटात होते. या चित्रपटात नाना पाटेकर गँगस्टर दाखवला आहे. या चित्रपटामधील अभिनयाबद्दल ३७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारआणि फिल्मफेअर पुरस्कारांमध्ये नाना पाटेकरला सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्याचा पुरस्कार देखील मिळाला होता.
…आणि नाना आगीच्या तडाख्यात सापडला
परिंदा चित्रपटाच्या शुटिंगवेळी एक घटना घडली होती. चित्रपटाच्या शेवटी नाना पाटेकरला एक सीन करायचा होता. नानाला सीन समजावून सांगण्यात आला. तुमच्या चारी बाजूला आग लागलेली असेल. जमिनीवर दारूच्या बाटल्यांच्या फुटलेल्या काचा पडलेल्या असतील. जसा पालन तुटेल तसे तुम्हाला उडी मारुन बाजूला व्हायचे आहे. कॅमेरा सुरु झाला. डायरेक्टरने ऍक्शन म्हणत इशारा केला. सीन सुरु झाला. नानाने उडी मारली, पण जमिनीवरच्या फुटलेल्या काचांमध्ये जाऊन पडला. त्याला आगीतून बाहेर निघताच येईना. आगीने नानाला घेरले. नाना आगीत होरपलायला लागला. हाका मारायला लागला. त्वरित सगळ्यांनी नानाला आगीच्या बाहेर काढले.
दवाखान्यात डॉक्टरकडे नानाने केली ही अजब मागणी
नाना आगीत चान्गलाच होरपळला होता. त्याच्या हाताची त्वचा खाली लोम्बत होती. नानाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आई. वर्षभर उपचार चालले. उपचारादरम्यान नानाचा एक किस्सा घडला. शिरीष काणेकरांनी तो किस्सा लिहला आहे. दवाखान्यात वेदनापाशात अडकलेल्या नानाने डॉक्टरांकडे चांदी पांडेच्या चित्रपटांची कॅसेट मिळतील का असा प्रश्न विचारला. त्यावर डॉक्टर बुचकळ्यात पडले आणि त्यांनी त्यामागचे कारण विचारले. त्यावर नाना बोलला, “चंकीचे चित्रपट बघताना जी वेदना होईल, त्याच्यापुढे या शारीरिक वेदना कमी वाटतील.
आपल्याला हि माहिती आवडल्यास अवश्य लाईक आणि शेअर करा व आमचे पेज लाईक करायला विसरू नका.